शरद पवार व नानांची भेट होताच मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत!

मंत्रीमंडळ बदलाबाबत पटोले दिल्लीत काय भूमिका मांडणार याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार व नानांची भेट होताच मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत!
Sharad Pawar, Nana Patolesarkarnama

मुंबई : राजस्थानमध्ये (Rajasthan) दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेत मोठा धक्का दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) नेत्यांना मंत्रीमंडळ बदलाचे वेध लागले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी भेट घेतली. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पटोले पवार यांना भेटले असे सांगण्यात आले. तरी मंत्रीमंडळ बदलाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोले हे मंगळवारी दिल्लीलाही जाणार असल्याची माहिती आहे. मंत्रीमंडळ बदलाबाबत पटोले दिल्लीत काय भूमिका मांडणार याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Nana Patole
पवारांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंचा हात स्वतः वर केला... त्यानंतर इतिहास घडला!

दरम्यान, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते शासकीय कामकाजापासून दूर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतर होणारी मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री ऑनलाइन हजर राहण्याची शक्यता आहे. त्या बैठकीतही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काही संकेत मिळण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar, Nana Patole
नाना पटोले म्हणाले, भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही...

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिकामे आहे. या पदावर काँग्रेस कोणाला संधी देणार त्यावर पुढील समीकरणे ठरणार आहेत. नानांना प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मंत्रिमंडळातही स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आपण संघटनेतच काम करण्यात खूष असल्याचे नानांनी जाहीरपणे सांगितले होते. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांना बसविण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या साऱ्या बाबींवर नाना पटोले हे पक्षातील नेत्यांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनिल देशमुख आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची एक-एक जागा मंत्रिमंडळात रिक्त आहे. त्या भरणार की तशाच ठेवणार याची उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in