Nana Patole : एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री : नानांनी डिवचलं!

Nana Patole : मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं म्हणाले की, ते मोदी शहांचे हस्तक आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यातून प्रकल्प गुजरातला गेल्यावर यासाठी विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर याचे खापर फोडले जात होते. आता नाना पटोले यांनी शिंदेवर बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्याचे, अशी टीका पटोले यांनी केली.

Nana Patole
आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे हे महाराष्टराचे मुख्यमंत्री नसून ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. यामुळेच महाराष्ट्राचे सगळेच प्रकल्प गुजरातमध्ये चालले आहेत. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं म्हणाले की, ते मोदी शहांचे हस्तक आहेत. त्याच्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम शिंदे करत आहेत, असे आरोप पटोले यांनी केला.

Nana Patole
काँग्रेस वंचित आघाडीबाबत, नाना पटोले म्हणाले…

दरम्यान, विरोधकांकडून सरकारवर प्रकल्पावरून सातत्याने टीका करण्यात येत होती. या खोके सरकारवरून महत्त्वपूपर्ण क्षेत्रांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. उद्योग (Industry) आणि शेती क्षेत्राचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे. महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in