मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपची 'बुस्टर सभा'!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बुस्टर सभेवर नाना पटोले (Nana Patole) यांनी निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपची 'बुस्टर सभा'!
Nana Patolesarkarnama

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकिम, जो. जो. थॉमस, श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, गजानन देसाई आदी उपस्थित होते.

Nana Patole
"फुकटात करमणूक" : उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेच्या सभेची दोन शब्दांत खिल्ली

या वेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजप (BJP) सरकारने कामगार हिताच्या कायद्यामध्ये मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे. मात्र, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करु.

Nana Patole
ठाकरे सरकारवर राज्यपाल खूश; महाराष्ट्र दिनी केला कौतुकाचा वर्षाव

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, केंद्रातील (Central Government) भाजप सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत. मात्र, जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.