नाना पटोलेंना डावलले ; कार्यकारिणी निवडीवरुन गटबाजी उघड

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर मंत्र्यांनी डावलेल्या मंडळींना नव्यात यादीत पद देऊन त्यांची बोळवण केल्याची चर्चा आहे. या नेमणुका दिल्लीतून झाल्याने पटोले यांच्यासाठी धक्काही मानला जात आहे.

नाना पटोलेंना डावलले ; कार्यकारिणी निवडीवरुन गटबाजी उघड
Nana Patolesarkarnama

मुंबई : महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशने (Congress Maharashtra) नुकतीच नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नियुक्त्यांमध्ये स्थानिक नेत्यांच्या शिफारशी डावलून केंद्रातील नेत्यांकडून परस्पर बदल झाल्याचा आरोपानंतर राज्य कॉंग्रेसमध्ये उफाळलेला असंतोष शांत करण्यासाठी ४० अतिरिक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.

Nana Patole
बिल्डर अविनाश भोसले, गोयंका, ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांवर गुन्हा

काँग्रेसमधील गटबाजी काही संपत नसल्याचे दिसत आहे. साधारपणे सव्वामहिन्याआधी अडीचेहून अधिक कार्यकर्त्यांची भरती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर मंत्र्यांनी डावलेल्या मंडळींना नव्यात यादीत पद देऊन त्यांची बोळवण केल्याची चर्चा आहे. या नेमणुका दिल्लीतून झाल्याने पटोले यांच्यासाठी धक्काही मानला जात आहे.

संघटनेची बांधणी करताना दोन-तीन टप्प्यांत पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा झाली आहे. त्यामुळे या विस्तारित कार्यकारिणीला गटबाजीचे कारण जोडणे योग नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निवडणुकांत सततचा पराभव पदरात पडल्यानंतरही पुन्हा उभारी घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसमध्ये फारसे बदल होताना दिसत नाहीत. उलट नेत्यांमधील वाद वाढत असल्याची चर्चा आहे.

मंत्र्यांना बदलण्यापासून प्रभाग पद्धतीवरून पक्षाचे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांत एकवाक्यता नसल्याचे उघड झाले. अशात पक्षश्रेष्ठींनी जवळपास ५० नव्या पदाधिकाऱ्यांची निवडीची यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. या यादीत प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि कार्यकारिणी समित्यांसह काही शहरांच्या अध्यक्षांच्या नेमणुका केल्या. याआधी २६ ऑगस्टलाही सुमारे तीनशे पदाधिकाऱ्यांच्या नावे जाहीर करण्यात आली होती. या निवडीत राजकारण झाल्याचा आरोप करीत काही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखविले होते. हा वाद तेवढ्यावरच न थांबता नाराजांच्या बैठकांचा सत्रही सुरू झाले होते. या पक्षांतर्गत वादाचे पडसाद निवडणुकांत उमटून स्व: घात होण्याची चर्चा संघटनेच्या वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर पहिल्या यादीत नसलेल्यांची वर्णी लावून श्रेष्ठींनी तोडगा काढला; मात्र, पटोले यांच्या संमतीशिवायच, ही यादी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.