Nana Patole Statement: नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका; म्हणाले...

Narendra Modi News: केंद्रातील सरकार बनिया वृत्तीचे
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासने देऊन नागिरकांना मोठी स्वप्ने दाखवितात. दिलेली आश्वासने ते कधीच पूर्ण करीत नाहीत. त्यांच्यासारखा खोटारडा माणूस पाहिला नाही, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी युनिफॉर्म तयार करणार असे म्हणाले होते. त्यानतंर त्यांनी देशातील संरक्षण विभागाचेच खासगीकरण केले. चीनने आपल्या देशावर कब्जा केला, मात्र देशातील ५६ इंचची छातीचे नेतृत्व यावर बोलताना दिसत नाहीत.मी पंतप्रधान मोदी यांच्या सारखा खोटारडा माणूस नाही." (Latest Marathi News)

Nana Patole
MVA News : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खेळ; 'मोठ्या भावा'चा मात्र लागेना मेळ !

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचाही पटोले यांनी यावेळी समाचार घेतला. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, "सध्या जगाच्या पाठीवर दिसणारे भारतातील कॉम्पुटर इंजिनियर ही राजीव गांधी यांची देण आहे.आताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर एका काळ्या टोपीवाल्याला बसवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले यांचा वारंवार अपमान केला."

Nana Patole
BJP News: नड्डांच्या राज्य दौऱ्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नेमण्याची डेडलाईन हुकली; इच्छुक धास्तावले

केंद्रातील सरकार (Central Government) बनिया वृत्तीचे असल्याची टीकाही पटोले यांनी केली. ते म्हणाले, "सध्या देशभरात कृत्रिम महागाई सुरू आहे. लोकांना गरीब करून गुलाम करण्यासाठी ही भाजपची नीती आहे. केंद्रातील भाजप सरकार हे बनिया वृत्तीचे आहे." यानंतर त्यांनी नाव न घेताल औरंगाबाचे खासदार इम्तियाज जलिल यांचाही समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com