ऐन पावसाळ्यात नाना पटोले अन् काँग्रेस मुंबईत उतरणार रस्त्यावर; कारण...

Congress | Nana Patole | राज्यभरातील काँग्रेस जिल्हा मुख्यालयांवर होणार आंदोलनं...
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : दिल्लीतील मोदी सरकार (Modi Government) विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस (Congress) भीक घालत नाही, असे म्हणत काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीला बोलाविण्याच्या घटनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

पटोले म्हणाले, सोनिया गांधी सध्या आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात आणि सूडाच्या राजकारणाविरोधात काँग्रेस २६ जुलैला (मंगळवार) मुंबईत मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल. तसेच जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयातुन मुक्त केले जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे, असाही इशारा त्यांनी दिला. २१ तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, आता त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. (Congress | Nana Patole | Latest news)

राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. यातून काहीही निष्पन्न झालेले नाही आणि होणारही नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही. काँग्रेसने सुडाचे राजकारण कधीच केले नाही पण मोदी सरकार मात्र लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे. काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही दडपशाहीला घाबरत नाही. काँग्रेस सोनिया गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हुकुमशाही सरकारला जनताच त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.

या शांततापूर्ण सत्याग्रहामध्ये स्वतः नाना पटोले, आमदार भाई जगताप, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्यभरातील काँग्रेस जिल्हा मुख्यालयांवर जिल्हा काँग्रेसचे नेते पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदारांसह सर्व विभाग, सेल, आघाडी यांचे पदाधिकारी यांनीही सत्याग्रहात सहभाही होऊन केंद्र सरकारच्या अत्याचाराचा निषेध करावा असे निर्देश पटोले यांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com