मित्रप्रेमापोटी नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदले देवेंद्र फडणवीसांचे नाव

हा टॅटू पाहून देवेंद्र फडणवीस माझ्यावर रागवले. मात्र, कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण करण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांच्या काम करण्याच्या वृत्तीने सात जन्म फडणवीसांचा पाईक राहून काम करण्याची माझी इच्छा असल्याची भावनाही नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
मित्रप्रेमापोटी नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदले देवेंद्र फडणवीसांचे नाव
The name of Devendra Fadnavis was tattooed by Narendra Patil on his hand out of love

सातारा/ ढेबेवाडी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी नुकताच आपल्या फेसबुक पेजवर हातावर देवेंद्र नाव गोंदल्याचा फोटो व्हायरल केला आहे. नरेंद्र पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळची मैत्री आहे. ते जिवलग मित्र असल्याने त्यांनी मित्रप्रेमापोटी आपल्या हातावर देवेंद्रजींचे नाव गोंदले आहे. पण, सध्या याची सोशल मीडियावर मात्र, चांगलीच चर्चा रंगली आहे. The name of Devendra Fadnavis was tattooed by Narendra Patil on his hand out of love

अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव असल्याने त्यांना अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद देऊन भाजप व शिवसेनेच्या युती सरकारने नरेंद्र पाटील यांचा सन्मान केला. याचा काळात या महामंडळाचे पूनर्जिवित करून महामंडळासाठी निधीची भरीव तरतूद केली.

माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री. फडणवीस यांनी सातत्याने मदत केली. त्यामुळे नरेंद्र पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक निर्माण झाली. तेथूनच त्यांच्या मैत्रीचे पर्व सुरू झाले. विविध कार्यक्रम, गणेशोत्सव तसेच माथाडींचे विविध कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहात असत.

गणेशोत्सवासाठी श्री. फडणवीस नरेंद्र पाटलांच्या कुटुंबासह घरी जात होते. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जवळीकही निर्माण झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी त्यांची घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यांच्या या मैत्रीतूनच नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र गोंदले आहे. याबाबतचा फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हायरल केला. त्यानंतर मात्र, सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. 

याविषयी नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नात देवेंद्र फडणवीस यांच्या सिंहाचा वाटा होता. पाटणच्या दौऱ्यात पुरग्रस्तांना मदत करताना देवेंद्र फडणवीस यांच्या मदत करण्याच्या वृत्तीने मी प्रभावित झालो होते. त्यातूनच मी देवेंद्र नाव हातावर गोंदले आहे. मुळात देवेंद्र हे माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचे नाव हृदयावरच गोंदणार होतो.

टॅटू पाहून फडणवीस रागवले...

हा टॅटू पाहून देवेंद्र फडणवीस माझ्यावर रागवले. मात्र, कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण करण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांच्या काम करण्याच्या वृत्तीने सात जन्म फडणवीसांचा पाईक राहून काम करण्याची माझी इच्छा असल्याची भावनाही नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.  

Related Stories

No stories found.