आम्ही हिंदू पद्धतीनं लग्न केलं ; पत्नीनं धर्मांतर केलं : ज्ञानदेव वानखेडे

''नवाब मलिक (nawab malik) मला मुस्लिम म्हणून का संबोधतात याच उत्तर त्यांनी द्यावं, फोटोकॉपीचा आधार घेत नवाब मलिक यांनी जे दावे केले ते पूर्ण चुकीचे आहेत,'' असे ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede)यांनी न्यायालयास सांगितले.
Dnyandev Wankhede, Nawab malik
Dnyandev Wankhede, Nawab malikSarkarnama

मुंबई : एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यांनी २८ कागदपत्रे न्यायालयात सादर केले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे परिवाराबाबत केलेले सगळे टि्वट यावेळी ज्ञानदेव वानखेडेंनी उच्च न्यायालयात वाचून दाखविले.

''नवाब मलिक (nawab malik) मला मुस्लिम म्हणून का संबोधतात याच उत्तर त्यांनी द्यावं, एनसीबी जॉईन केल्यापासून समीर वानखेडे कधीच दुबईला गेले नाहीत. फोटोकॉपीचा आधार घेत नवाब मलिक यांनी जे दावे केले ते पूर्ण चुकीचे आहेत,'' असे ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede)यांनी न्यायालयास सांगितले. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वतःच आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेचे गुणपत्रक, पोलिस सेवेत असतानाचे कागदपत्र व अन्य पुरावे न्यायालयासमोर दाखल केले.

''मी हिंदू महार आहेत आणि माझी पत्नी झाईदा ही मुस्लिम होती पण आम्ही त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर झाईदा हिंदू धर्मात समाविष्ट झाली,'' असे ज्ञानदेव वानखेडेंनी न्यायालयात सांगितलं. ''नवाब मलिकांनी केलेले दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत,'' असा युक्तीवाद वानखेडेंच्या वकिलांनी न्यायालयात केला.

Dnyandev Wankhede, Nawab malik
किरण गोसावीचा आणखी एक प्रताप ; भोसरीतील तरुणाला नोकरीसाठी गंडा

''नवाब मलिक यांनी दुबईतील हॉटेल म्हणून यास्मिन आणि समीर वानखेडे यांचा जो फोटो ट्विट केला होता, तो फोटो दुबईतला नसून मुंबईतल्या एअरपोर्टवरचा आहे. ते ट्विट पूर्णपणे खोटं आहे,'' असे ज्ञानदेव वानखेडेंनी न्यायालयात सांगितलं. वानखेडे कुटुंबियांच्या बाजूने अर्षद शेख न्यायालयात युक्तिवाद करीत आहेत. त्यांनी आज एकूण २८ कागदपत्र न्यायालयासमोर ठेवली.

कंगनाचा पद्मश्री काढून अटक करा; नवाब मलिक आक्रमक

मुंबई: अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangna Ranout) स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. '1947मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं आहे.' या वक्तव्यामुळे देशभरातून तिच्यावर टिका होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे, ''लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है,''अशा शब्दात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. याचवेळी त्यांनी कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणीही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com