माझं मुंडक तेवढं बाहेर होतं...चोवीस तास चिखलात रूतलेल्या सरसाबाईंची थरारक कहानी....

आजी सरसाबाई चोवीस तास चिखलात अडकल्या होत्या. त्यांना पाहून नातेवाईकांच्याही आश्रूंचा बांध फुटला.
माझं मुंडक तेवढं बाहेर होतं...चोवीस तास चिखलात रूतलेल्या सरसाबाईंची थरारक कहानी....
My head was so out ... the thrilling story of Sarasabai who was stuck in the mud for twenty four hours ....

कऱ्हाड : ''माझ मुंडक तेवढ बाहेर होत... बाकी सगल चिखलात रूतले होते. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुऴे जीव वाचला.. पोरा मी माझ मरण माझ्या डोळ्यान बघितलंय,'' असे सांगून मिरगावच्या सत्तरीतील सरसाबाई देवजी बाकाडे यांनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी केली. मिरगावच्या आजी सरसाबाई चौवीस तासापेक्षा जास्त काळ चिखलात रूतून बसल्या होत्या. My head was so out ... the thrilling story of Sarasabai who was stuck in the mud for twenty four hours ....

मिरगाव येथे गुरूवारी झालेल्या भूस्खलनात सरसाबाईंचे घर वाहून गेले. घरात सरसाबाई, त्यांच्या सुनबाई श्रीमती सुमन, नातू व्यंकटेश, नात अनुष्का असे राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षापूर्वी वारला. घरी एवढीच लोक असतात. मुसळधार पावसाने गुरूवारी मिरगाववर आरिष्ट कोसळले. १९ जण ढिगाराखाली गेल्याची भिती होती. सायंकाळी डोंगरातून गावकऱ्यामच्या डोळ्यादेखत झालेले भूस्खलन अधिक धडकी भरवणारे ठरले. त्यातूनही अनेकजण वाचलेही. मात्र देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मिरगावच्या आजीच्या बाबतीत खरी ठरली. 

सरसाबाई यांचे घर दहा फूट चिखलात रूतले. काय करावे कळण्यापूर्वीच जो तो जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत धावू लागला. सरसाबाईचे सुन, नातू नातही धावली. मात्र चिखलात आजी रूतून बसली. सुरक्षीत स्थऴी आलेल्या श्रीमती सुमन यांना आज्जी नसल्याचे समजताच त्यांच्या दुःखाला पारवार राहिला नव्हता. शोध सुरू झाला. त्याता पाऊस, चिखलाचा मोठा अडथळा येत होता. चोवीस तास ओलांडले अन् चिखलता माखलेल्या आज्जी रांगत बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत. असे बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला दिसले. 

वेगाने त्यांनी आजी सुरक्षितस्थळी नेले. आजी सरसाबाई चोवीस तास चिखलात अडकल्या होत्या. त्यांना पाहून नातेवाईकांच्याही आश्रूंचा बांध फुटला. शुक्रवारी वाचलेल्या आजींना मानसिक धक्का मोठा बसला होता. त्या काहीच बोलत नव्हत्या. सर्वच बाधितांना कोयनेच्या मराठी शाळेत आणले आहे. तेथेही आजी काही बोलल्या नाहीत. मात्र, आज त्या पहिल्यांदाच बोलल्या अन् त्यांच्याही आश्रूंचा बांध मोकळा झाला. ''काय सांगू लेका त्या दिवळी माझे मरणच म्या पाहिले'', असे सांगून सरसाबाई यांनी बिथरत्या शब्दात निसर्गाचा पाहिलेला प्रलय सांगितला. 

त्या म्हणाल्या, ''काय सांगू म्या घरात बसले होते, संध्याकाळची वेळ होती. कडाडकड.. असा आवाज झाला व सगळ्या डोंगरच गावावर येवून आदळला. माझ्या घरात मानेऐवढ पाणी व्हत. माझ मुंडकच तेवढ चिखलात नव्हत. बाकी सार चिखलत रूतल होते. कोण मदतीला येईना. काय हालता पण येईना चोवीस तास रात्रंदिन तशीच चिखलात रूतले होते. हळू हळू हालाचालीला वाव मिळाला. मग रांगत रांगत लहान बाळागात घराबाहेर आले. बाहेर सारा चिकलच होता. जीव वाचला होता. आता सुरक्षीत जाव अस वाटून पावल सपासप पडली. अन्‌ त्यावेळी वाचले. घरांच्या बघितल्यावर जीव भांड्यात पडला.''

Related Stories

No stories found.