Pune By Election Result: माझी स्थिती 'थोडी खुशी, थोडा गम' अशी; निकालानंतर अजित पवारांची भावना

BJP vs Congress : कसब्यात महाविकास आघाडीचा विजय तर चिंचवडमध्ये पिछाडी
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar on By Election : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघडीकडून प्रतिष्ठेची बनविली होती. या दोन्ही ठिकाणी बड्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यातील कसब्याचा निकाल लागला असून चिंचवडचा निकाल लवकरच लागणार आहे.

कसब्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडून आले आहेत. त्यांना ७२५९९ मते मिळाली. त्यांनी भाजचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. रासने यांना ६१७७१ मते मिळाली.

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीचे नाना काटे (Nana Kate) पिछाडीवर आहेत. येथे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भावना व्यक्त केली.

Ajit Pawar
Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील सुनावणी आता १४ मार्चला; शिंदे गटाच्यावतीने वेळेवर ज्येष्ठ वकील मैदानात

महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेसचे कसब्यातील उमेदवार धंगेकरांचा विजय मोठा मानला जात आहे. तर चिंचवडमधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेद्वार नाना काटे सुमारे ११ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचा विजय तर चिंचवडमध्ये पराभव पाहून पवारांनी भावना व्यक्त केल्या. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, "सध्या माझी स्थिती थोडी खुशी थोडा गम अशीच झाली आहे."

यानंतर पवारांनी कसब्यातील विजय आणि चिंचवडमधील पिछाडीच्या स्थितीची कारणे सांगितली. ते म्हणाले, "दोन्ही पोटनिवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. कसब्यात धंगेकर यांच्यासारख्या उमेदवारामुळे आम्ही आर्धी लढाई जिंकली होती. त्यांनी तळागाळात काम केले आहे. जनतेचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यासाठी दुचाकीवर फिरणारे ते कार्यकर्ते आहेत. यापूर्वी महापालिकेत त्यांनी भाजपच्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला."

Ajit Pawar
Kasba By Election Result: धंगेकरांनी ‘महाशक्ती’ला दाखवला ‘कात्रजचा घाट’: भाजपचा बालेकिल्ला २८ वर्षांनंतर उद्‌ध्वस्त

चिंचवडबाबत पवार (Ajit Pawar) म्हणाले की, "चिंचवडमध्येही कसब्यासारखीच स्थिती असती. मात्र बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. राहुल कलाटे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकले नाही. तसेच त्यांनी दाखल केलेला अर्ज बाहेर निघणार नाही, याची काळजीही सत्ताधाऱ्यांनी घेतली. या दोन्ही ठिकाणी भाजपने सत्तेचा फायदा घेत निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करता येईल ते ते केले. मात्र जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com