Sanjay Raut : माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून ; राऊतांचा अप्रत्यक्षपणे मोदी-शहांवर हल्ला!

Sanjay Raut : १०३ दिवस तुरुंगात होतो, त्यामुळे १०३ आमदार निवडूण आणणार
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०२ दिवसानंतर जामीन मिळाला आहे. त्यांना पीएमएलएच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिकांनी त्यांची मोठी रॅली काढली. राऊत आपल्या भांडुप येथील निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांनी शिवसैनिकांशी संबोधित. या वेळी त्यांनी विरोधकांवर तूफान हल्ला केला. आपल्याला अटक करण्याचे आदेश दिल्लीतून आले होते, असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर केला.

मरण पत्करीन पण शरण जाणार नाही. माझ्या अटकेचे आदेश हे दिल्लीतून आलं. त्यांना वाटत होतं, मला अटक केल्याशिवाय त्यांचं सरकार येत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी शहांवर हल्लाबोल केला. शिवसेना तुटलेली नाही. मशाल भडकलेली आहे. देशाच्या राजकाणातील सगळ्यात मोठी चुक म्हणजे संजय रावतांना अटक केली. न्यायालयाने सांगितले संजय राऊत यांची कोणतीच चूक नाही. १०३ दिवस तुरुंगात होतो, त्यामुळे १०३ आमदार निवडूण आणणार, असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut
'देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली!'

राऊत म्हणाले, मी उद्यापासून कामाला लागणार आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे. न्यायदेवतेचे आभार मानतो. संपूर्ण देशात शिवसेना ही एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आहे. मी राजकीय सुडाचा बळी ठरलो. मरन पत्कारीन पण शरण जाणार नाही, असे मी सांगितले होते, असेही राऊत म्हणाले

Sanjay Raut
'शिवसेनेला दहा हत्तीचे बळ; वाघ बाहेर पडलाय, शिंदे-फडणवीस सावध रहा!'

शंभर दिवसानंतरही जनता मला विसरली नाही. पुढचा मुख्यमंत्री आपल्याच शिवसेनेचा होणार आहे. राज्यातील बोके खोक्यात बसलेत आहेत, असा घणाघात त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला. मला संपवणं इतकं सोपं नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. मला माहित होते शिवसैनिक माझी वाट बघतोय, आता सुटलो आहे. आता सुसाट सुटायचे आहे, असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com