MVA in Mumbai : नाना पटोलेंनी वेधले सरकारच्या कार्यपद्धतीकडे लक्ष; म्हणाले, "सर्व प्रकल्प..."

Nana Patole : भीतीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याचा आरोप
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole attacks on BJP : सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती, बारसू परिसरातील सरकारमधील लोकांच्या जमीनीच्या माध्यमातून काळ्याचे पांढरे करणे, तसेच सामान्यांकडून जीएसटी वसूल करायचा आणि उद्योगपती मित्रांची कर्जमाफी करायची, असे धोरण राज्य आणि केंद्र सरकारचे आहे. या पद्धतीने काम करून हे सरकार जनतेचा विकास करीत नाही. तर ते मूठभर लोकांचा विकास करतेय. हा सर्वप्रकारचा खटाटोप त्यांच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठीच सुरू आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला.

मुंबई (Mumbai) येथे सोमवारी (ता. १) वज्रमूठ सभा पार पडली. त्यावेळी पटोले यांनी केंद्रातील भाजपसह राज्य सरकारवर निशाणा साधला. पटोले म्हणाले, मी पावसाळ्यात बारसूला (Barsu Refinery) गेलो होतो. त्यावेळी नागरिकांनी रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील निसर्गावर विपरित परिणाम होणार असल्याचे सांगितले होते.या बारसू परिसरात परप्रांतियांच्या नावाने जमिनी घेतलेल्या आहेत. हे सर्व सरकारमधील अनेक नेत्यांचे बगलबच्चे आहेत. हा प्रकल्प झाला तर तेथील जमिनींना मोठा दर मिळणार आहे. त्यातून सरकारमधील लोकांचा काळा पैसा पांढरा करण्याचे षडयंत्र आहे. त्यासाठी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या महिलांवर या सरकारने लाठीचार्ज केला. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीसबळाचा वापर केला.

नोकरभरतीवरूनही पटोले यांनी राज्य सरकारला (State Government) सुनावले आहे. पटोले म्हणाले, "सरकारने ७५ हजार नोकरभरतीचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आता कंत्राटी पद्धत वापरण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी कंत्राटदार भरणार असेल तर सुराज्य कसे होणार. ही कंत्राटीपद्धीतने नोकरभरतीसाठी भाजपच्या नेत्यांच्या कंपन्या आहेत. या माध्यमातूनही नोकरभरतीत बगलबच्च्यांनाच लाभ होणार आहे."

यावेळी पटोले यांनी सरकार फक्त मूठभर लोकांसाठी काम करत असल्याचीही टीका केली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, "हे सरकार चांगले काम करताना दिसत नाही. जीएसटीच्या माध्यामातून सामान्य जनतेला लुटायचे काम सध्या सुरू आहे. त्यातील जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी होते आहे. जनतेकडून जमा झालेल्या पैशातून मूठभर 'मित्रां'चे कर्ज माफ करण्यासाठी केला जात आहे. हा कुठला न्याय? या सरकार मूठभरांसाठी काम करीत आहे."

आता झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) महाविकास आघाडी सरकराने बाजी मारली आहे. असाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांतही मिळवू, अशी भीती सरकारला असल्याने निवडुका होत नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला. पटोले म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी काम केले जाते. या महत्वाच्या संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर टाकल्या जातात. या निवडणुका टाळून या सरकारचे देशातील संविधानिक व्यवस्था सपविण्याचे षडयंत्र आहे. या संस्थांमध्येही महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. त्यामुळे भिऊन या निवडणुकाच होत नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com