Shivsena News : शिवसेना शाखा प्रमुखाचा उल्हासनगरमध्ये चाकूने वार करून खून

Ulhasnagar Shiv Sena branch chief Murder : या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले
Shabbir Shaikh
Shabbir ShaikhSarkarnama

डोंबिवली : उल्हासनगरमध्ये शिवसेना शाखाप्रमुखाची सात ते आठ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. जनता कॉलनी येथे जुगाराच्या अड्ड्याबाहेर ही घटना घडली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Murder of Shiv Sena branch chief in Ulhasnagar)

उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक पाच येथील जय जनता कॉलनी परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर शुक्रवारी मध्यरात्री एकाची ७ ते ८ जणांच्या टोळीने धारदार चाकूने शिवसेना शाखाप्रमुखाचा खून (Murder) केला आहे.

Shabbir Shaikh
Pune News: अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या नेत्याच्या नवीन घरी बावनकुळेंची भेट; जुन्या, निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

शब्बीर शेख असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते शिवसेना (Shivsena) शाखाप्रमुख होते. शब्बीर शेख हे जुगाराचा क्लब चालवत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यरात्री हल्लेखोर हे चॉपर, तलवार असे धारदार हत्यार घेऊन परिसरात शब्बीर शेख यांचा शोध घेत आले. जुगाराच्या अड्ड्यावर हल्लेखोर पोहोचताच इतरांनी तेथून पळ काढण्यास सुरुवात केली.

Shabbir Shaikh
Paranda Bazar Samiti : सावंतांच्या मतदारसंघातील बाजार समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; संचालकांच्या अपहरणामुळे निवडणूक राज्यात गाजली

पडद्याच्या आडून पळ काढणाऱ्या शब्बीर शेख यांना हल्लेखोरांनी गाठले. काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. जखमी अवस्थेत शब्बीर शेख यांना क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना कल्याण येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. पण, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे.

Shabbir Shaikh
Kejriwal Boycott Niti Aayog Meeting : आप-केंद्र सरकार वाद पेटला; नीती आयोगाच्या बैठकीवर मुख्यमंत्री केजरीवालांचा बहिष्कार

दरम्यान, या खूनप्रकरणी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा तपास करीत आहेत. हा जुगाराचा अड्डा पोलिसांना माहीत नव्हता का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com