Police Bharati Recruitment: पोलिस भरती प्रक्रियेत मुन्नाभाई एमबीबीएस : चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Mumbai Police| पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून कॉपी करणारे मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
Pune Police Bharati
Pune Police Bharati Sarkarnama

Police Bharati Recruitment : पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत (Police Bharati Recruitment) पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून कॉपी करणारे मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.या विदयार्थ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. (Munnabhai MBBS found in police recruitment process: Cases registered in four police stations)

मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा देतो,तशा प्रकारे काही विद्यार्थी पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देत होते. पण पोलिसांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने हे विद्यार्थी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी रविंद्र काळे, नितेश आरेकर, अशोक ढोले, या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ४१ अ ची नोटीस देऊन सोडले. तर युवराज जारवाल आणि बबलु मेढरवाल यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. याशिवाय पोलिसा या विद्यार्थ्यांना मदत करण्याऱ्या साथीदारांचाही शोध घेत आहेत. (Mumbai News)

Pune Police Bharati
Shahajibapu On Patole : काँग्रेसने कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष नेमलाय : शहाजीबापूंचा नाना पटोलेंवर पलटवार

कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे परिसरातील जे. बी. खोत हायस्कूल केंद्रावर पोलीस भरती प्रक्रियेची परीक्षा सुरु होती. रविंद्र काळे नावाच्या विद्यार्थ्यांने पेनात सिमकार्ड वापरून कानात ब्ल्यू टूथचा वापर करून पेपर सोडवताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, त्याच्याकडील सर्व साहित्य जप्त केलं. तसेच त्याच्या साथीदाराचा शोध सुरु केला. (Police Bharati Recruitment latest news)

तर, गोरेगाव येथील उन्नत महानगर पालिका केंद्रावर युवराज जारवाल या विद्यार्थ्याने इलेक्ट्रीक इअरबर्डच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवताना आढळून आला. विशेष म्हणजे, जारवाल याने उजव्या हातात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत सनग्लोव्ज घातले होते. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्यात सिमकार्ड, चार्जिंग सॉकेट आणि मायक्रो माइक असलेले इलेक्ट्रनिक डिव्हाईस त्याच्याकडे आढळून आले. तर दुसरीकडे भांडूप आणि मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रांवरही असेच अशाच प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in