मुंब्र्यात पकडले 15 लाखांचे ड्रग्स

नायजेरीन आरोपी हा देशात कसा वास्तव्य करतोय? त्याची पार्श्वभूमी काय? याबाबत तपास करण्यात येत आहे.
मुंब्र्यात पकडले 15 लाखांचे ड्रग्स
Thane PoliceSarkarnama

ठाणे : मुंब्र्यात मोफेड्रीन (MDपावडर) चा व्यापार करणाऱ्या 4 जणांना पकडण्यात मुंब्रा पोलीस (Thane Police) आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाला (NDPS) यश आले आहे. यात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींमध्ये एका नायजेरियन व्यक्तीचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या चारही जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी एकाच ठिकाणाहून अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी अंदाजे 15 लाखहुन अधिक किमतीचे मोफेड्रीन ड्रग्स जप्त केले आहे. हे अमली पदार्थ त्यांनी कुठून आणले व त्याची विक्री कुठे करणार होते याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Thane Police
कायदा मोडायचा नाही, पण आम्ही आता तर मुंबईला येणारच

मुंब्रा बायपास जवळील वाय जंक्शन रोडवर एक इसम अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच शुक्रवारी (ता.19 नोव्हेंबर) मुंब्रा पोलिसांनी NDPS च्या टीम सोबत सापळा रचत एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. या नायजेरियन व्यक्तीची झडती घेतली असता त्याकडून 5 लाख 6 हजार रुपये किमतीचे 100 ग्राम मोफेड्रीन ड्रग्स मिळाले. गोडविन इफेनजी (वय 41) असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईच्या सेक्टर 3 मध्ये राहतो. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यानंतर पोलिसांना काल (ता.20 नोव्हेंबर) एक जण MD ड्रग्स विक्री करणार येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेच पुन्हा NDPS च्या टीम सोबत मुंब्रा बायपास वाय जंक्शन जवळ सापळा रचत फिल्मी स्टाईलने एक किलोमीटर पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. नदीम खान (40) असे या आरोपीचे नाव असून 10 लाख 320 रुपये किमतीचे 110 ग्राम मोफेड्रीन ड्रग्स त्याच्याकडून जप्त करण्यात आले. नदीम हा मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात राहणार असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Thane Police
...तर एसटीला खासगीकरणाशिवाय पर्याय नाही

याबाबात मुंब्राचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी सांगितले की, याआधी 17 नोव्हेंबरला पोलिसांना मुंब्रा बायपास वाय जंक्शन जवळ 2 जण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 2 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 ग्राम वजनाचे 35 हजार किमतीचे मोफेड्रीन ड्रग जप्त केले होते. मोहम्मद आरिफ मोहम्मद (वय 36) आणि चंचल चिनौरिया (वय 34) असे या दोघांची नावे असून हे दोघेही मुंब्रा हद्दीत राहणारे आहेत. या चारही आरोपींपैकी नदीम हा सराईत गुन्हेगार आहे. तर नायजेरीन आरोपी हा देशात कसा वास्तव्य करतोय? त्याची पार्श्वभूमी काय? त्याचा व्हिझा तपासून त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करून घेणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. तसेच, हे चौघे आरोपी हे ड्रग्स कुठून घेऊन आले आणि कोणाला विकणार होते? याचा तपास मुंब्रा पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in