Mumbai University Senate Election : आदित्य ठाकरेंचा कस लागणार : श्रीकांत शिंदेंनी केली व्यूहरचना!

Mumbai University Senate Election : शिवसेना फुटल्यानंतरची पहिली मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, आदित्य ठाकरे -श्रीकांत शिंदे आमने सामने!
Shreekant Shinde | Aditya Thackeray |Amit Thackeray
Shreekant Shinde | Aditya Thackeray |Amit Thackeray Sarkarnama

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी शिवसेना, भाजप, शिंदे गट व मनसेकडूनही जोरदार मोर्चेबांधणी होत आहे. मागील १० वर्षापासून मुंबई विद्यापीठ सिनेटवर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वर्चस्व राखले आहे. मात्र आता शिवसेनेतल्या फुटीनंतर यंदाची ही पहिलीच मुंबईची सिनेट निवडणूक असल्याने, या निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे असा जोरदार सामना रंगणार आहे.

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ही मुंबई विद्यापीठ सिनेटची पहिलीच निवडणूक आहे. मागील १० वर्षांपासून आदित्य यांनी सिनेट निवडणुकीवर एकहाती वर्चस्व आहे. मात्र यंदाची स्थिती वेगळी आहे. भाजप, शिंदे गट व मनसे अशी युती निवडणुकींसाठी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे आदित्य पुन्हा वर्चस्व राखतील की यंदाची परिस्थिती वेगळी असेल, याबाबत चर्चा होत आहे.

Shreekant Shinde | Aditya Thackeray |Amit Thackeray
NCP मधील गटबाजी चव्हाट्यावर ; शरद पवारांच्या समोरच पदाधिकाऱ्याने मांडली कैफियत

या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांचे पुत्र यश सरदेसाई यांनी शिंदे गटाचे युवा नेते पूर्वेश सरनाईक यांची याबाबत भेट घेतली. मागील दहा वर्ष मुंबई विद्यापीठावर आदित्य ठाकरे यांचे म्हणजेच युवा सेना ठाकेर गटाचे एकहाती सत्ता आहे. ठाकरेंच्या विद्यापीठावरील या सत्तेला सुरूंग लावण्याचे प्रयत्न शिंदे गट-भाजप-मनसे करणारआहेत.

दरम्यान सिनेट निवडणुकीसाठी युवा सेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आदित्य य़ांनी बोलवली आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिघांच्या युतीमुळे ठाकरेंपुढील आव्हान वाढले आहे. यंदाची सिनेट निवडणूक अत्यंत अटीतटीचीचुरशीची होईल, अशी चर्चा आहे. सिनेट निवडणुकीत मुख्य लढत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट अशी होणार आहे. शिवसेनेचे दोन्ही गच आमने-सामने असणार आहेत.

Shreekant Shinde | Aditya Thackeray |Amit Thackeray
Mumbai News : "अडीच वर्षांत घराबाहेर पडले नाही..." ; भाजपच्या उत्तर भारतीय नेत्याने ठाकरेंना डिवचलं!

गेल्या पदवीधर सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेने एकहाती विजय मिळवला होता. 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने कब्जा मिळवला होता. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर युवासेनेचे ही दोन गट झाले आहेत. मागे विजयी झालेल्या १० उमेदवारांपैकी पैकी 2 सिनेट सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. यामुळे आता चुरशीची लढत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com