शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत.
शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
shivsenasarkarnama

मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आज (ता. १७ एप्रिल) आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय ४२) असे त्यांचे नाव आहे. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ही घटना कुडाळकर यांच्या राहत्या घरात घडली आहे. (Mumbai Shiv Sena MLA's wife commits suicide)

shivsena
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रजनी कुडाळकर यांनी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे समजते. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात ‘पोस्टमॉर्टम’साठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.