राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत; न्यायालयाने बजावली नोटीस

तुरुंगातून बाहेर येताच राणा दाम्पत्याने माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi News
Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात राज्य सरकारने जामीन रद्द करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयात केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली असून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. अजामीनपात्र वॉरंट का बजावू नये, असं न्यायालयानं म्हटलं आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

राणा दाम्पत्याला जामीन देताना या प्रकरणावर माध्यमांशी न बोलण्याची अट न्यायालयाने घातली आहे. पण नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच माध्यमांशी संवाद साधत ठाकरेंवर हल्लाबोल केला. याचाच आधार घेत राज्य सरकारने जामीनाच्याा अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामिनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारकडून जामीन रद्द करण्याची मागणी केली.

Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi News
राज्य कसं चालवायचं, हे ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं! नवनीत राणांचा पुन्हा हल्लाबोल

राज्य सरकारच्या अर्जावर न्यायालयाने रामा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट का बजावू नये, यावर न्यायालयाने खुलासा मागवला आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत (Praddep Gharat) म्हणाले, "मी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या काही क्लिप पाठवल्या आहेत. त्या क्लिप काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, मला वाटते की त्यांचे संभाषण त्यांना जामीन आदेशात घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करते. त्यामुळे मी ते न्यायालयासमोर आणण्यास बांधील आहे. मी न्यायालयाला विनंती करीन की त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला ताब्यात घ्यावे,"

नवनीत राणा यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) यांना त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. "मी उद्धव ठाकरेंना आव्हान देते की त्यांनी मतदारसंघ निवडा आणि थेट जनतेने निवडून या. मी त्यांच्या विरोधात लढेन. मी प्रामाणिकपणे काम करून निवडणूक लढवणार आहे. मी जिंकेन आणि त्यांना (मुख्यमंत्र्यांना) जनतेच्या शक्तीची जाणीव होईल. शिवसेनेची भ्रष्ट राजवट संपवण्यासाठी मुंबईत प्रचार करणार असून रामभक्तांना पाठिंबा देणार असल्याचेही नवनीत राणा यांनी काल माध्यमांना सांगितलं.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी 23 एप्रिल रोजी अटक केली होती. या जोडप्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे शिवसेना आणि राणा दांपत्य यांच्यात राडा झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले होते. बारा दिवस ते दोघे तुरुंगात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com