लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; नियमावली जाहीर

नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जाणार असून 12 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Loudspeaker
LoudspeakerSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात मुंबई पोलिसांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपले काम सुरू केले असून मशिद आणि मंदिरांना लाऊडस्पीकरबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तसेच, समाजविघातक कृत्ये, चिथावणी खोर वक्तव्य, धार्मिक गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींचा यादी तयार करण्यासही सुरुवात केली असून आयपीसी कलम 144, 149 आणि 151 इत्यादी अंतर्गत अनियंत्रित घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचाही विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच प्रतिबंधात्मक प्रमुख म्हणून नोटीस बजावण्यात आल्या असून प्रतिबंधात्मक उपायांसाठी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Loudspeaker
तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी नार्वेकरांची नियुक्ती अन् मुंबईतील मंदिराचा मार्ग मोकळा

मुंबई पोलिसांकडून मशिदी आणि मंदिरांना सुचना करण्यात आल्या असून दिलेल्या सुचनाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या व नियमांचे पालन न करता बांधलेल्या मशिदी आणि मंदिरांना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिर व मशिदींना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल. तसेच ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात येणार आहे, असे मुंबई पोलिसांकडून सष्ट करण्यात आले आहे.

Loudspeaker
भोंग्यांच काय करायचं? वळसे पाटील राज ठाकरेंनाही विचारणार

याबरोबरच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद वा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही हे देखील पाहिले जाणार असून बेकायदेशीर लाऊडस्पीकर आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 33w आणि 135 सह सर्व विद्यमान नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जाणार असून 12 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com