भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढणार; संजय पांडेंनीच सांगितलं कारण

प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Nupur Sharma Latest Marathi News
Nupur Sharma Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलेल्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भाजपने (BJP) शर्मा यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. (Nupur Sharma Latest Marathi News)

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मोठा वाद निर्माण झाला असून जगभरातील अनेक मुस्लिमबहुल देशांचा याचा निषेध केला आहे. त्यानंतर भाजपने शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले. (Mumbai Police will soon send a summon to suspended Nupur Sharma)

Nupur Sharma Latest Marathi News
काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

शर्मा यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी शर्मा यांना याप्रकरणी लवकरच समन्स बजावले जाणार असल्याचे सांगितले. त्यांचा जबाब घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नुपूर शर्मा यांचा माफीनामा

पक्षाने निलंबित केल्यानंतर शर्मा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. मी मागील अनेक दिवसांपासून टीव्हीवरील चर्चेत सहभागी होत होते. तिथे दररोज माझे आराध्य भगवान महादेव यांचा अपमान होत होता. माझ्या समोर हे म्हटलं जात होतं की, ते शिवलिंग नसून कारंजे आहे, दिल्लीत्या पदपथांवर अनेक शिवलिंग दिसतात, जाऊन पुजा करा. माझ्यासमोर सतत महादेवांचा अपमान होत असल्याने मी सहन करू शकले नाही आणि रागाच्या भरात काही गोष्टी बोलले. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेते. कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं नुपूर शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com