सेलिब्रेटींचा पाठलाग करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना ब्रेक.. मुंबई पोलिसांचा कारवाईचा दंडुका!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी एनसीबीच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
mumbai police will seize media vehicles who are chasing celebrities
mumbai police will seize media vehicles who are chasing celebrities

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींची चौकशी सुरू केली आहे. अनेक सेलिब्रेटी चौकशीसाठी येत असल्याने वृत्तवाहिन्यांच्या गाड्या त्यांचा बेदकारपणे पाठलाग करीत असल्याचे चित्र दिसत होते. पोलिसांनी अखेर या गाड्या जप्त करण्याची पावले उचलली आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह काल चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. काल तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही काल चौकशी झाली आहे. आज पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. दीपिकाची आज सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही चौकशी करण्यात आली.  

करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता या क्षितिज प्रसाद प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एनसीबीने कालपासून त्याची चौकशी सुरू केली होती. तब्बल 24 तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने आज अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दररोज नवनवीन सेलिब्रेटी येत आहेत. या सेलिब्रेटींचा पाठलाग अनेक वृत्तवाहिन्यांच्या गाड्या करीत असल्याचे चित्र रोजचे होते. मात्र, यामुळे रस्त्याने जाणारे नागरिक आणि वाहनांना धोका निर्माण होत होता. अखेर पोलिसांना या गाड्यांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. 

या विषयी बोलताना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार म्हणाले की, चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तींचा पाठलाग प्रसारमाध्यमांच्या अनेक गाड्या करीत असल्याचे आज दिसून आले. या गाड्यांमुळे ते स्वत:सह चौकशीसाठी बोलावलेले व्यक्ती आणि सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे या गाड्या जप्त केल्या जातील. 

एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com