Police Transfers : ठाकरे सरकारने साईड पोस्टिंगवर पाठवलेल्या अधिकाऱ्यांना फडणवीसांनी पुन्हा मुंबईत आणले..

Mumbai Police Transfers: वसुली प्रकरणातील डीसीपी पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज यांना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईत आणले आहे.
Mumbai Police Transfers
Mumbai Police Transferssarkarnama

Mumbai Police Transfers: सत्ता बदलली की पोलिसांच्या बदल्या, फेरनियुक्ती हे नवीन नाही, हे चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिसत आहे. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची त्यांच्या इ्च्छुकस्थळी बदली करण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला असल्याची टीका होत आहे. (Mumbai Police Transfers latest news)

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ज्या अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंगवर पाठवले होते,त्यांना पुन्हा मुंबईत आणले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हे बदलीचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त स्तरावरील 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अठ्ठावीस डीसीपींच्या बदल्यांशिवाय नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या जागांवरून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.आघाडी सरकारच्या काळात ज्या अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंगवर पाठवण्यात आले होते, त्यांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले आहे. त्यापैकी काहींनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत काम केले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलीस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांची देखील नावे होती.

Mumbai Police Transfers
Gujarat Election : प्रचारासाठी कोटींची उड्डाणे, विमाने,हेलिकॉप्टरच्या बुंकिगसाठी भाजप, काँग्रेस, आपची धावाधाव

अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ 3 या ठिकाणी करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर साईड पोस्टिंग केली होती. तर मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग वसुली प्रकरणातील डीसीपी पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज यांना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईत आणले आहे. बालसिंग राजपूत यांना मुंबई सायबर गुन्हे विभागाचा पदभार, हेमराज राजपूत यांना मुंबई परिमंडळ सहाचे उपायुक्त पद देण्यात आले आहे

Mumbai Police Transfers
Gujarat Election : काँग्रेस बदलणार नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव..

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांना आर्थिक गुन्हे शाखा,प्रकाश जाधव यांना अमली पदार्थविरोधी पथक उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.

प्रज्ञा जेडगे यांची सशस्त्र पोलीस ताडदेव, योगेशकुमार गुप्ता यांची जलद प्रतिसाद पथक, शाम घुगे यांची सुरक्षा, नितीन पवार यांची सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कलिना, अभिनव देशमुख यांची परिमंडळ 2 सह एकूण 28 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे ते वाक्य आठवते. ते म्हणाले होते की, मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा चुकीच्या कारणांमुळे डागाळली गेली आणि राजकीय वापरामुळे त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या प्रयत्नात अप्रतिम प्रयत्न दिसतो. सरकार बदलते, बाजू बदलते. काही त्यांच्या बाजूने बाहेर पडतात, काही त्यांच्या बाजूने बाहेर पडतात. हा खेळ असाच चालतो, यातूनच जनतेला त्रास होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com