मोठी बातमी : मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय संचालकांनाच बजावले समन्स

मुंबई पोलिसांनी थेट सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
मोठी बातमी : मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय संचालकांनाच बजावले समन्स
Subodh Kumar JaiswalFile Photo

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करीत आहे. या प्रकरणी मागील आठवड्यात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांना समन्स बजावले होते. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) थेट सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) प्रमुख रश्मी शुक्ला यांनी बदली रॅकेट संबंधित एक रेकॉर्डिंग केले होते. त्याचा एक अहवालही त्यांनी तयार केला होता. हा अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात वाचून प्रसारमाध्यमांसमोर ठेवला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तींविरोधात गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण घडले त्यावेळी जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. नंतर त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. आता याच प्रकरणात जयस्वाल यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Subodh Kumar Jaiswal
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट परमबीरसिंहांच्या घरावरच चिकटवली नोटीस

दरम्यान, अनिल देशमुखांवरील 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. कुंटे यांना ८ ऑक्टोबरला सीबीआयच्या मुंबई कार्यालयात तर पांडे यांनी ९ ऑक्टोबरला सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला होता सीबीआयने आमच्या कार्यालयात येऊन चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आठवडाभरातच थेट सीबीआय संचालकाना समन्स बजावण्यात आले आहे.

Subodh Kumar Jaiswal
येडियुरप्पा अन् त्यांच्या पुत्राचे तोंड बंद करण्यासाठीच छापे! माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची 25 मे रोजी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते प्रतिनियुक्तीवर केंद्रीय सेवेत गेले हेाते. सीबीआयच्या संचालकपदासाठी तीन नावे आघाडीवर होती. त्यापैकी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी वर्णी लागली होती.

Related Stories

No stories found.