धक्कादायक : तो घरीच छापत होता नोटा ; दीड लाखांच्या बनावट नोटासह अटक

शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत.

धक्कादायक : तो घरीच छापत होता नोटा ; दीड लाखांच्या बनावट नोटासह अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (Crime Branch of Mumbai Police) गुप्तवार्ता विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.पायधुनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत.पायधुनीच्या परिसरातील करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथे आरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता.


धक्कादायक : तो घरीच छापत होता नोटा ; दीड लाखांच्या बनावट नोटासह अटक
महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं गूढ गुरुवारी उकलणार ; CBIकडून आरोपपत्र

मागील अनेक दिवसापासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली आहे.

शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. त्यांच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

CBIची माहिती ; नरेंद्र गिरी महाराजांनी 'त्या' कथित व्हिडिओमुळे केली आत्महत्या

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज ( Mahant narendra giri) मृत्यू प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi) तीन जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपपत्रात सीबीआयनं धक्कादायक माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी त्या कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल होईल, म्हणून आत्महत्या केली असून हा व्हिडिओ तीन जणांनी पाहिला. पण हा व्हिडिओ सीबीआयच्या हाती लागलेला नाही. हा व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये दोन जण हे प्रयागराज येथील तर एक जण हरिव्दार येथील आहे, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in