Mumbai Police News : पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या टि्वटनं खळबळ ; डीजीपीकडे मदतीची याचना

Mumbai Police News : सई कांबळे यांनी पोलिस महासंचालकाकडे टि्वट करुन तक्रार दाखल केली आहे.
Mumbai Police
Mumbai Police Sarkarnama

Mumbai Police News : महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पोलिस अधिकाऱ्याचा पत्नीने तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिस दलात हा चर्चेचा विषय ठरला आहे. मागील तेरा वर्षापासून दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरुन पती मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. (Mumbai Police News)

सचिन कांबळे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी सई कांबळे यांनी पोलिस महासंचालकाकडे टि्वट करुन तक्रार दाखल केली आहे. सचिन कांबळे हे मुंबई पोलीस दलात पीएसआय आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट तिच्या पती विरोधात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने हा चर्चेला विषय ठरला आहे.

सई कांबळे यांनी आपले पती सचिन कांबळे यांच्याविरोधात बोरिवलीच्या एम एच बी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या, पण याठिकाणी तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सई कांबळे यांनी टि्वट करुन तक्रार केली.

Mumbai Police
Sanjay raut : अण्णा हजारेंच्या विषयी जनतेच्या मनात शंका, असे राऊत का म्हणाले..

काय आहे प्रकरण

2019 मध्ये सचिन कांबळे यांनी मला मोजकीच कपडे आणि भांडी सोबत देऊन सोडून दिले. यानंतर अनेकवेळा ते फक्त भेटण्यासाठी येत असतात. मात्र खर्चासाठी पैसे देत नाही, मला शेजाऱ्यांकडून उसनवारी करून दिवस काढावे लागत आहे, असे 38 वर्षीय सई कांबळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com