परमबीरसिंह-वाझेची गुप्त भेट अन् उपनिरीक्षकासह चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात

परमबीरसिंह आणि सचिन वाझे यांची गुप्त भेट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Param Bir Singh and Sachin Waze
Param Bir Singh and Sachin Waze Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. आता परमबीरसिंह आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची गुप्त भेट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुख यांच्या वकिलांनी परमबीरसिंह आणि वाझे यांच्या भेटीची माहिती दिली होती. त्यावर समितीने ही भेट आपल्यासमोर झाली नसल्याचे स्पष्ट करीत आक्षेप घेण्यास नकार दिला. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे.

Param Bir Singh and Sachin Waze
परमबीरसिंह यांना न्यायालयाकडून आणखी एका प्रकरणात दिलासा

या भेटीमुळे मोठा गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. एकाच प्रकरणातील दोन आरोपींची गुप्त भेट झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित आहे. सध्या हा एनआयएच्या ताब्यात असला तरी तो तळोजा कारागृहात आहे. त्याला समितीसमोर हजर करण्याची जबाबदारी एक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर होती. आता या भेटीमुळे या चार जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या भेटीची चौकशी सुरू केली असून, यात हे चौघे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

Param Bir Singh and Sachin Waze
शशी थरूर ट्रोल झाले पण सेल्फी त्यांनी काढलीच नव्हती!

अशी झाली भेट

परमबीरसिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. आज पहिल्यांदाच ते दक्षिण मुंबईतील होमगार्ड ऑफिसमध्ये आले. रजेवरुन परतल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. ते त्यांच्या कक्षात गेले होते. दरम्यान, चांदीवाल समितीचे कार्यालय याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आहे, तर गृहरक्षक कार्यालयाचे कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. समितीसमोर हजर राहण्यापूर्वी आज परमबीरसिंह आणि वाझे यांची तेथील एका खोलीत गुप्त भेच झाली. त्यावेळी या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले ते कळू शकले नाही. तब्बल आठ महिन्यांनंतर परमबीरसिंह आणि वाझे समोरासमोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com