सलमान खानला आलेल्या धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये...

Salman Khan| Sanjay Pandey| Mumbai Police| 'सिद्धू मूसेवाला' याच्या हत्येनंतर बॉ 'सलमान खान'लाही जीवे मारण्याची धमकी आल्याने सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Sanjay Pandey
Sanjay Pandey

मुंबई : विषय जेवढा गंभीर आहे, तेवढ्याच गांभीर्याने पोलीस तपास करत आहे. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. गरज पडली तर आम्ही पोलीस सुरक्षा वाढवू. धमकीच्या पत्रात जो मजकूर आहे, त्यावर पोलीस तपास सुरू आहे, असा खुलासा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केला आहे. (Salman Khan latest news)

गेल्या आठवड्यात पंजाबमधील (Punjab) प्रसद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पंजाबमध्ये तणाव वाढला आहे. 'सिद्धू मूसेवाला' याच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता 'सलमान खान'लाही जीवे मारण्याची धमकी (Salman Khan threat letter) आल्याने महाराष्ट्र सरकारकडून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Sanjay Pandey
अपक्ष आमदार माझ्या संपर्कात, शिवसेनेला मतदान करण्यासाठी दबाव! राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

जे पत्र सलमान आणि त्याच्या वडिलांच्या नावाने आलेलं आहे त्याची पडताळणी सुरु आहे. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत. जो तपास होणे आवश्यक आहे त्यानुसार तपास सुरु आहे. सलमान खानची सिक्युरिटी वाढवणे ही आमची अंतर्गत गोष्ट आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. हे पत्र कुठून आलं त्यावर आताच बोलण, निष्कर्ष काढणं आताच योग्य ठरणार नाही. तर दुसरीकडे, पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचीही पोलिसांनी धमकीच्या पत्राबाबत चौकशी केली आहे.

दरम्यान, सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Special Team) खासगी सुरक्षेसह अर्धा डझन पोलीसही सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. तसेच त्याच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. रविवारी (5 जून) सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले. त्यानंतर दोघांनीही वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धूच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याने सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com