खासदार शेवाळे यांनी त्या महिलेला 56 लाख रुपये अन् आय फोनही दिला

सोशल मीडियावर तिने शेवाळेंची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
Rahul Shewale News in Marathi, Shivsena Newssarkarnama

मुंबई :शिवसेना (Shivsena) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. शेवाळेंनी संबधीत महिलेच्या विरोधात खंडणी, फसवणूक, आणि बदनामी केल्याची तक्रार केली आहे. (Rahul Shewale latest Marathi news)

अंधेरी सत्र न्यायालयाने साकीनाका पोलिसांना तक्रार घेण्याचा आदेश दिला आहे. त्या महिलेने आपल्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी शेवाळेंनी संपर्क साधला. शेवाळेंनी त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणला, तिनं बदनामी करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
खासदार राहुल शेवाळे यांचे 'ते' व्हिडीओ बाहेर काढण्याची धमकी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

शेवाळे यांच्याकडून संबधीत महिलेने आत्तापर्यंत ५६ लाख रुपये, आयफोनसह बारा भेटवस्तू घेतल्या आहेत.सोशल मीडियावर तिने शेवाळेंची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पत्नीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न न केल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.(Shivsena latest Marathi News)

Rahul Shewale News in Marathi, Shivsena News
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना हात जोडले ; ठाकरे-राऊतांवर भाष्य करण्याची गरज नाही !
  • राहुल शेवाळे हे शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांपैकी एक प्रमुख नाव आहे.

  • शिवसेनेत मातोश्रीच्या निकवर्तीय वर्तुळातही शेवाळे यांचे नाव घेतले जाते.

  • शेवाळे यांनी पालिका स्तरावरुन शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली.

  • अणुशक्तीनगर येथून नगरसेवक म्हणून निवडून आले.

  • २००४ मध्ये त्यांनी तुर्भे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला.

  • २०१४ मध्ये मोदी लाटेत ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

  • २०१९ मध्येही राहुल शेवाळे लोकसभेची निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in