मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट परमबीरसिंहांच्या घरावरच चिकटवली नोटीस

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता थेट परमबीरसिंह यांच्या घरावरच नोटीस चिकटवली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट परमबीरसिंहांच्या घरावरच चिकटवली नोटीस
Param Bir Singh File Photo

मुंबई : माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीरसिंह (Param Bir Singh) हे रशियात पळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात राज्य सरकारनेही सिंह याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे सारे सुरू असतानाच सिंह हे भारतातून पळून गेले आहेत. आता थेट त्यांच्या घरावरच मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने नोटीस चिकटवली आहे.

परमबीरसिंह यांच्या खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मुंबईतील परमबीरसिंह यांच्या घरावर नोटीस चिकटवली. खंडणी प्रकरणात 12 ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहावे, असे त्यात म्हटले आहे. आता परमबीरसिंह दोन दिवसांत गुन्हे शाखेसमोर प्रकटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते चौकशीला हजर न राहिल्यास त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Param Bir Singh
येडियुरप्पा अन् त्यांच्या पुत्राचे तोंड बंद करण्यासाठीच छापे! माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

परमबीरसिंह यांनी प्रकृतीच्या तक्रारीचे कारण देऊन रजा घेतली होती. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून, मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले होते. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीरसिंह यांनी प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचे सांगत रजा वाढवून घेतली. परमबीरसिंह यांना 29 ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले, मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

Param Bir Singh
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष? कार्यकारी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

परमबीरसिंह हे 7 एप्रिलला तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. मुंबईत 25 फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. या प्रकरणानंतर 17 मार्चला परमबीरसिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्ड विभागात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार 22 मार्चला स्वीकारला. त्यानंतर 4 मेपर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. नंतर 5 मेपासून ते सुटीवर गेले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून रशियाला गेले असावेत असं तपास यंत्रणांना वाटते आहे.

Related Stories

No stories found.