मुंबईकरांसाठी संजय पांडेंनी शेअर केला वैयक्तिक मोबाईल नंबर

''मला मुंबई पोलिस दलात आयुक्त म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हा माझा सन्मान आणि अभिमान आहे,''
Sanjay Pande
Sanjay Pandesarkarnama

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे (Sanjay Pande)यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी एक भावनिक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. ''मला मुंबई पोलिस दलात आयुक्त म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हा माझा सन्मान आणि अभिमान आहे,'' असे पांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या फेसबुकवरुन त्यांना मुंबईकरांशी संवाद साधला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतही आपल्याला अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत त्यांना आपला मोबाईल क्रमांक शेअर केला आहे.

''मुंबई पोलिसांची स्वतःची गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. कदाचित, मुंबई पोलिसांची तुलना नेहमीच स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. या पार्श्‍वभूमीवर मला मुंबई पोलिस दलात आयुक्त म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हा माझा सन्मान आणि अभिमान आहे,'' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संजय पांडे म्हणाले, '' या कठीण काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतही आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा आवश्यक वाटत असल्यास आणि त्याबाबत काही सूचना असल्यास कृपया मला 9869702747 या क्रमांकावर कळवा. आम्ही निश्चितपणे योग्य सूचनांची काळजी घेण्याचा आणि त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न करू,''

Sanjay Pande
राज्यपालाचं अर्धवट भाषणं ही लाजीरवाणी गोष्ट, महाराष्ट्राचा अपमान!

याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तांचे पद होतं. परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानं नगराळे यांच्याकडं मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com