Parambir Singh : परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; रात्री उशिरा खलबतं !

Parambir Singh : परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन देखील झाले.
Anil Deshmukh and Parambir Singh
Anil Deshmukh and Parambir SinghSarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 'वर्षा'बंगल्यावर झालेल्या या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्तातच आहे. (parambir singh latest news)

गुरुवारी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली.सुमारे २० मिनिटे या बैठकीत मुख्यमंत्री परमबीर सिंह यांच्यात चर्चा झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाची सुनावणी झाल्यावरच दिसून परमबीर सिंह हे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. ते गेले अनेक दिवस कुणाच्याही संपर्कात नाहीत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी आपले नाव पुढे केल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीन मागताना केला आहे.यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन देखील झाले.

आपल्याविरोधातील आरोप हे तपास यंत्रणेची इच्छा आणि कल्पनेवर आधारित आहेत, असा दावा देशमुख यांनी केला आहे. तसेच ज्या साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवरही देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकरण परमबीर आणि वाझे यांच्या जबाबांवर आधारित आहे. परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन देखील झाले.

Anil Deshmukh and Parambir Singh
Avadhoot Tatkare : ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार तटकरेंचा आज भाजपमध्ये प्रवेश

वाझे यांच्याविरोधात अनेक आरोप आहेत. बारमालकांकड़ूनही त्यांनीच पैसे वसूल केले असा दावा देशमुख यांनी जामिनासाठीच्या अर्जात केला आहे. परमबीर यांनीच वाझे यांना पोलीस दलात पुन्हा सामावून घेतले. दोघांनी स्वत:ला वाचवण्यासाठी संगनमताने आपले नाव पुढे केल्याचे आरोप देशमुख यांनी केले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेरचा येण्याचा मार्ग सोपा होत आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात देशमुखांना 11 महिने जेलमध्ये रहावे लागले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com