मातोश्रीला आव्हान देणाऱ्या राणा दांपत्याचे घर अवैध बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रडारवर

BMC | Navneet Rana | Ravi Rana | मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्याने राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला.
Navneet Rana | Ravi Rana |
Navneet Rana | Ravi Rana |

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अपूर्ण राहिल्याने त्यांचा कोठडीतील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. तर दूसरीकडे आता मुंबई पालिकेनं राणा यांना नोटीस बजावली आहे. रवी राणा यांनी मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत त्यांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा या दांपत्याने मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं चार मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे. दरम्यान राणा दांपत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी (२ मे) अपूर्ण राहिली. आज (३ मे) रमजान ईदमुळे न्यायालयाला सुट्टी असल्याने बुधवारी (ता. 4) त्यावर निकाल दिला जाईल. सध्या नवनीत राणा आणि रवी राणा कोठडीत असून ७ मे ला त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे.

Navneet Rana | Ravi Rana |
फडणवीसांनी मिस्टर इंडिया होऊन बाबरीचा ढाचा पाडला; शिवसेनेने पुन्हा डिवचले

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्याने राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला. आता हा संघर्ष चांगला ताणला गेला आहे. महापालिकेने पाठवेल्या नोटीसमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेचं पथक 4 मे रोजी खार येथील राणांच्या निवासस्थानी बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) झालंय का, याचा तपास करणार आहे.

न्यायालयात काय झाले

सरकारी वकील वकिल प्रदीप घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, लोकशाहीमध्ये नागरी हक्कांनाही मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत आव्हान दिले. पोलिसांनी राणा दांपत्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र ते ऐकत नव्हते. वारंवार सोशल मिडियावरून आक्षेपर्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांशी बोलण्याचा पद्धतही राणां दापत्यांची चुकीची होती, असा दावा घरत यांनी केला होता.

हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली राणा दांपत्याला काहीतरी वेगळेच करायचे होते. सरकार कमकुवत होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पद्धतीने त्यांचे वर्तन होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचे कार्ड खेळले. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलेले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने राणा दांपत्याने हे सर्व केल्याचा युक्तिवादही घरत यांनी केला होता. तर बेकायदेशीरपणे ही कारवाई करण्यात आल्याचे राणांच्या वकिलांकडून सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com