न्यायालयाचा दिलाशानंतर राणा दांपत्याला मुंबई महापालिका देणार धक्का

BMC| Navneet Rana| Ravi Rana| रवी राणा यांनी मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे.
न्यायालयाचा दिलाशानंतर राणा दांपत्याला मुंबई महापालिका देणार धक्का
Navneet Rana| Ravi Rana

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. मागील बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य तुरुंगात आहेत.

एकीकडे दिलासा मिळाला असताना आता दूसरीकडे मुंबई महापालिकेचं एक पथक राणा दांपत्याच्या घरी रवाना झाले आहे. रवी राणा यांनी मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत त्यांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं चार मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे.

Navneet Rana| Ravi Rana
अशी विधानं करताना जरा डोकं ठिकाणावर ठेवा; संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

दरम्यान, न्यायालयाने राणा दांपत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. रवी राणा सध्या तळोजा कारागृहात तर नवनीत राणा भायखळा कारागृहामार्फत स्पॉंडिलायसिसच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात आहेत. न्यायालयाने दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद ३० एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

मात्र हा जामीन देताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला ३ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या तीन अटींमध्ये पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरु नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांंशी कोणत्याही प्रकारची छेडछा करु नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देवू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आज संध्याकाळ पर्यंत राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.