मुंबई महापालिका स्वबळावर निवडून आणणारच; राज ठाकरेंचा निर्धार

Raj Thackeray News : राज ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले...
Raj Thackrey
Raj ThackreySarkarnama

Raj Thackeray News : ''मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकीत तुम्ही ताकदीने उतरा. मुंबई महापालिकेत मनसेचा महापौर स्वबळावर निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत'', ते आज मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, ''सध्याची परिस्थिती पाहता राज्याच्या वातावरणात अजूनही निवडणुका दिसत नाहीत. आधी नोव्हेंबर नंतर डिसेंबरमध्ये निवडणुका (Elections) होतील अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही निवडणुका कधी होतील हा प्रश्न आहे. पण तरीही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका होतील असा अंदाज लावूयात. मात्र तुम्ही सर्व गटाध्यक्ष तयारीला लागा. पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. जे काम सांगितलं ते चोकपणे बजवा'', असं म्हणत ठाकरेंनी मनसैनिकांना एक प्रकारे निर्देश दिले आहेत.

Raj Thackrey
Raj Thackeray News : '' राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा..'' ; राज ठाकरेंची बोचरी टीका

''लोकांच्या घराघरांपर्यंत पोहचा, लोकांशी नम्रतेने बोला, मनसेने (MNS) केलेलं आजपर्यंतचे सर्व काम लोकांना सांगा. काम करताना तुमच्याकडचा एखादा शाखाध्यक्ष किंवा विभागाध्यक्ष चांगल काम करत नसेल तर मला कळवा. मी खोटं बोलत नाही, मला स्वत:भोवती हुजरेगीरी करणारे कार्यकर्त्ये नकोत, मला तुमच्याकडून एका अंकुशाची अपेक्षा आहे. या वरच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर तुमचा अंकुश असला पाहिजे. जर ते ऐकत नसतील तर मला येऊन सांगा. यापुढे जे सांगितलं जाईल ते सर्व काम व्यवस्थित कारा. आपलं काम लोकांपर्यंत पोहचवा'', असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com