Ganesh Naik
Ganesh Naiksarkarnama

भाजप आमदारानं भर सभेत फडणवीसांसमोरच महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले

देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत महापालिका अधिकाऱ्यांना गणेश नाईक (Ganesh Naik)यांनी भर सभेत खडे बोल सुनावलेत.

मुंबई : ''मी सांगणार नाही की तुम्ही 2 महिन्यात मुख्यमंत्री व्हाल मात्र 2024 ला नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis)होतील ते पण स्वबळावर ही जनसामान्यांची भावना आहे,'' असे मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले. गणेश नाईक यांनी केलेल्या या विधानामुळे चर्चा रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत महापालिका अधिकाऱ्यांना गणेश नाईक (Ganesh Naik)यांनी भर सभेत खडे बोल सुनावलेत.

आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले दिवाळे गाव हे पहिले स्मार्ट व्हिलेज होणार आहे. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Ganesh Naik
राऊतांचे मौन : मनसेचं टि्वट, आघाडी सरकार म्हणजे 'अमिताभ-जया-रेखा' यांचा 'सिलसिला'

''अंधार हा कायम राहत नाही तो उजेड होऊ शकतो, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना माझा संदेश आहे. कायद्याच्या कचोटीत अयोग्य असणाऱ्या गोष्टी अयोग्य समजा परंतु कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार आहेत ,'' असा अप्रत्यक्ष इशाराच मनपा अधिकाऱ्यांना दिला.

Ganesh Naik
पवारांचा मित्र असल्याचे सांगत गुन्ह्यांचा चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव

''आम्ही सूड घेणार या भावनेने बोलत नाही परंतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांचा छळ केला त्या लोकांना त्याचा जाब द्यावा लागेल हा शब्द गणेश नाईक निश्चितपणे देतो,'' असे आमदार गणेश नाईक म्हणाले. ''नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नवी मुंबई मनपातील अधिकारी काम करत असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक मागील अनेक महिन्यांपासून करीत आहे,'' असे नाईक म्हणाले. अखेर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आमदार गणेश नाईक यांनी मनपा अधिकाऱ्यांवरील आपला रोष व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com