'उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे रिझर्व्ह बॅंकच'; सोमय्यांचा नवा आरोप

BMC| Uddhav Thackeray| INS vikrant| यशवंत जाधवांवरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांकडून प्राप्तिकर विभागाचे स्वागत
Kirit Somaiya
Kirit Somaiya

मुंबई : प्राप्तीकर विभागाने (Income Tax) शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांच्या तब्बल 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जाधव यांनी काही व्यवहार हवालामार्फत केल्याचा संशय प्राप्तीकर विभागाला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केलं आहे. या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी ट्विट करत प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

''शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून आज मुंबई येथे बेनामी मालमत्तांच्या जप्त करण्याचा कारवाईचे मी स्वागत करतो, असं ट्वीट करत किरीट सोमय्या म्हणाले आहेत. "यशवंत जाधव यांनी तब्बल एक हजार कोटींची संपत्ती जमवली. आधीच्या 15 कोटींच्या ट्रान्झॅक्शनची माहिती आम्ही दिली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली. तेच पुरावे आम्ही ईडीलाही दिले. आज प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरु झाली. कारण त्यांच्या जुन्या मालमत्ता आणि आता स्वतःच्या नावावर असलेल्या 37 मालमत्ता आहेत. त्यांच्या काही नातेवाईकांच्या नावावर इतर 11 मालमत्ता आहेत. त्या सर्व मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरु केल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

Kirit Somaiya
मोरेंच्या हकालपट्टीनंतर तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; गळती रोखण्याचे मनसेसमोर आव्हान

"मुंबई महापालिका म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी एटीएम च आहे. एटीएम तुमच्या आमच्यासाठी, पण त्यांच्यासाठी तर ही रिझर्व्ह बँक आहे. नोटा छापण्याची एक मशीन नाही, तर मशीन्स आहेत. यशवंत जाधवांच्या घरातल्याच एकाने सांगितलं की, आमच्याकडे 10 टक्के येतात, बाकीचे 90 टक्के वांद्र्याला जातात. पाच वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन, दरवर्षी 50 हजार कोटींचं बजेट. विमल अग्रवाल त्याचे पार्टनर. यशवंत जाधवांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी जे निवडणूक प्रतिज्ञापत्र भरलं होतं, तिथूनच या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली.''असा आरोपही त्यांनी केला.

याच वेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतबाबत केलेल्या खुलाशांवरही प्रतिक्रीया दिली आहे. आयएनएस विक्रांतसाठी फक्त 35 मिनिटेच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करणार. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. तेव्हा काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केलं होतं. मग त्यांनी किती पैसे गोळा केले? असं प्रतिप्रश्नही किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी ऐकीव माहितीवर एफआयआर कशी दाखल केली, एकही पुरावा नसताना त्यांनी एफआयआर कशी लिहून घेतली? असा सवालही किरीट सोमय्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com