महिलेवर आरोप करताना लाज वाटत नाही का? महापौरांनी सोमय्यांना सुनावले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. आज पुन्हा त्यांनी महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत.
mumbai mayor kishori pednekar slams bjp leader kirit somaiya
mumbai mayor kishori pednekar slams bjp leader kirit somaiya

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळ येथे एका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या इमारतीतील घर बळकावले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. याला महापौरांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सोमय्या यांनी आरोप सिद्ध  केल्यास त्यानंतर दिली जाईल ती शिक्षा मी भोगेन, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. 

सोमय्या यांनी म्हटले आहे की, लोअर परळमधील गोमता नगर इमारत क्रमांक दोनमधील 601 क्रमांकाचा फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावला आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. या फ्लॅटमध्ये त्यांनी त्यांचे कार्यालय थाटले आहे. याबाबतची माहिती महापौरांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्विकासातील कुटुंबांसाठी राखीव होता. झोपडपट्टी पुनर्वसनन योजनेच्या (एसआरए) अधिकाऱ्यांनी याबाबतचे कागदोपत्री पुरावेही दिले आहेत.

सोमय्या यांच्या आरोपांना  महापौरांनी उत्तर दिले आहे. आरोप सिद्ध करा. हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे खुले आव्हान महापौरांनी सोमय्या यांनी दिले आहे. एका महिलेवर आरोप करताना लाज नाही वाटत का, अशा शब्दांत त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. यावर महापौरांची भाषा चुकीची असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी महापौरांचा पुत्र बोगस कंपन्यांमध्ये संचालक असल्याचा आरोप केला होता. 

हे ही वाचा : चेंबूरमध्ये खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
चेंबूर : चेंबूरमध्ये वाशीनाका परिसरात सह्याद्रीनगर झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सध्या सुरू आहे. त्यातील इमारतीसाठी खणलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून आज अकरा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. तेजवीर सिंग असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ओम गणेश नगर येथे हे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या पायासाठी खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्यात काही मुले पोहण्यासाठी जात. आज सायंकाळी तेजवीर सिंग हा मित्रांसोबत तेथे पोहण्यास गेला. मात्र, पाण्यात उडी मारल्यानंतर तो वरच न आल्याने मित्रांनी आरडाओरड केली. तेव्हा जवळच असलेल्या लोकांनी तेजवीरला बाहेर काढले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com