काँग्रेस-वंचितची गुप्त खलबत! आगामी पालिका-ZP निवडणुकीत नवीन समिकरण?

Vanchit Bahujan Aaghadi | Congress | काँग्रेसचा महाविकास आघाडीला दे धक्का!
Bhai Jagtap-prakash ambedkar
Bhai Jagtap-prakash ambedkar Sarkarnama

मुंबई : राज्यातील आगामी पालिका (Local Body Election) आणि ZP निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेला (Shivsena) सोबत घ्या, असे आदेश नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांच्या नेत्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नजिकच्या काही दिवसांमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत महाविकास आघाडी होणार अशी चिन्ह आहेत. मात्र अशातच काँग्रेसच्या गोटातून एक मोठी येत असून यातून काँग्रेसने आपली वेगळी वाट धुंडाळायसा सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईमध्ये नुकतीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एक गुप्त बैठक पार पडली असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे. आगामी मुंबई आणि राज्यातील इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातही विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकर यांची लवकरच काँग्रेसमधील बड्या नेत्यांसह बैठक होण्याची शक्यताही या वृत्तामध्ये वर्तवण्यात आली आहे.

Bhai Jagtap-prakash ambedkar
शिवसेनाची जागा आता मनसे घेणार? NDA विस्तारासाठी भाजपचा रोडमॅप ठरला!

काल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षण (Obc Reservation) लागू झाल्याशिवाय निवडणुका घेवू नका, असा ठराव विधीमंडळाने एकमुखाने केला आहे. त्यावर आक्षेप घेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी प्रशासक नेमणे घटनाबाह्य असल्याची याचिका करण्यात आली होती. याच याचिकेरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

Bhai Jagtap-prakash ambedkar
संदीप देशपांडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरु

भाई जगताप काँग्रेसला बळ देणार?

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसचा जनाधार अगदीच नगण्य आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास शिवसेना काँग्रेसची जास्त जागांची मागणी पूर्ण करणार नाही, हे नक्की. त्यामुळे काँग्रेसने आपला जनाधार वाढवण्यासाठी भाई जगताप यांच्या नेतृत्वात वंचित सोबत जाण्याचा पर्याय निवडल्याचे चित्र असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र काँग्रेस - वंचितची युती झाल्यास भाई जगताप काँग्रेसला कितपत बळ मिळवून देणार हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com