Mumbai High Court : उच्च न्यायालयात नव्या मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती, पण 4 दिवसात पदमुक्त होणार..

Mumbai High Court : "मला कॉल सेंटरमध्ये 350 रुपयांच्या पार्ट टाइम जॉबची ऑफर आधीच देण्यात आली आहे,” असे ते मिश्किलपणे म्हणाले.
Mumbai High Court : R D Dhanuka
Mumbai High Court : R D DhanukaSarkarnama

Mumbai High Court justice : मुंबई उच्च न्यायालयाला अखेर काल शुक्रवारी दि. 26 मे रोजी नवे मुख्य न्यायमूर्ती मिळाले. देशाच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती आर डी धानुका यांची 46 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. मात्र ते केवळ चारच दिवस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झालेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणार आहे. रविवार 28 मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे.

न्यायमूर्ती रमेश धानुका यांची 23 जानेवारी 2012 रोजी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते 30 मे 2023 रोजी निवृत्त होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय 62 आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 19 एप्रिल रोजी न्यायमूर्ती धानुका यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती.

मागील वर्षी 11 डिसेंबर रोजी माजी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यापासून पाच महिन्यांहून अधिक काळ उच्च न्यायालय कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्तीविना होते. त्यानंतर ज्येष्ठ न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला यांची कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्तीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली.

Mumbai High Court : R D Dhanuka
Satara News : ही तर सत्तेच्या भांगेची नशा.. सदाभाऊ, शंभूराज देसाई भिडले....

गंगापूरवाला यांची 13 मार्च 2010 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तोपर्यंत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती न झाल्यास ते 23 मे 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून नियुक्त्या लागू होतील असे आदेशात नमूद केले आहे.

"मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून चार दिवस काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे," असे न्यायमूर्ती धानुका म्हणाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई बार असोसिएशनने उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी त्यांना निरोप दिला. कार्यक्रमात, धानुका म्हणाले की, 'मी उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती म्हणून एक दशकाच्या शेवटी नियुक्त झालो आहे, तुमच्या योजना काय आहेत? हे मला विचारले गेले आहे. त्यामुळे गेल्या 2-3 महिन्यांपासून मला एक एसएमएस दिसून येतो, मला कॉल सेंटरमध्ये 350 रुपयांच्या पार्ट टाइम जॉबची ऑफर आधीच देण्यात आली आहे,” असे ते मिश्किलपणे म्हणाले.

सी जे दत्ता यांची 28 एप्रिल 2020 रोजी कोविड-19 साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान नियुक्ती करण्यात आली होती आणि बी पी धर्माधिकारी यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. न्यायमूर्ती धानुका यांच्या आधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सर्वात कमी कार्यकाळ धर्माधिकारी यांचा होता, जे 27 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांचा या पदावरील कार्यकाल एक महिन्यापेक्षा थोडे अधिक राहिले होते.

Mumbai High Court : R D Dhanuka
University Chancellor : पुणे-मुंबई विद्यापीठाला लाभणार नवे कुलगुरू : निवडीआधीच प्राध्यापक संघटनांचा विरोध..

माजी न्यायमूर्ती बी एच मारलापल्ले म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धानुका यांचा "निश्चितच येथे सर्वात कमी कार्यकाळ असेल." ते पुढे म्हणाले, माजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती बिलाल नाझकी यांचा सर्वात कमी कार्यकाल होता. 14 नोव्हेंबर 2009 रोजी ओरिसा उच्च न्यायालयाचे 23 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नाझकी यांना बढती देण्यात आली होती. 17 नोव्हेंबर 2009 रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून जेमतेम दोन दिवस काम करायला मिळाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com