कोणतं आभाळ कोसळणार होतं? वानखेडेंच्या याचिकेवर उच्च न्यायालय भडकलं

समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात पोलिसांनीही गुन्हाही दाखल केला आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : एनसीबीचे (Narcotics Control Bureau) माजी मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या बारचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. त्यानंतर वानखेडे यांनी सोमवारी परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी परवाना पुन्हा बहाल करावी, अशी मागणी केली आहे. पण या याचिकेवरून उच्च न्यायालय मंगळवारी सुनावणीदरम्यान चांगलंच संतापले.

ठाणे (Thane) शहरातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये (Kopari Police Station) वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याचा आरोप वानखेडेंवर आहे. त्यामुळे बारचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. या निर्णय़ाला वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी उशिरा याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर लगेचच मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावरूनच न्यायालय भडकल्याचे दिसले.

Sameer Wankhede
कुणीही धुतल्या तांदळासारखं नाही! सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं

न्यायमुर्ती गौतम पटेल आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आल्यानंतर त्यांनी तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायमुर्ती पटेल म्हणाले, आमच्याजवळ सोमवारी या याचिकेचा उल्लेख करण्यात आला नव्हता. मग आज ही याचिका सुनावणीला कशी आली, असा सवाल त्यांनी केला. वानखेडे यांच्या वकील वीणा थडानी यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही सोमवारीच या प्रकरणाचा उल्लेख करण्याची वाट पाहत होतो. पण न्यायालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुचीबध्द केले जाईल, असं सांगितलं.

यानंतर न्यायालयाने अधिकाऱ्यांनाच कडक शब्दांत सुनावलं. न्यायमुर्ती जमादार म्हणाले, ‘एखादा गरीब व्यक्ती याचिका दाखल करतो आणि प्रकरण कधीच सुनावणीला येत नाही. पण एखादी प्रभावशाली व्यक्ती याचिका करते तेव्हा त्याची याचिका लगेच सुनावणीला येते. वानखेडे यांच्या याचिकेत अशी कोणती आवश्यक गोष्ट होती. आभाळा फाटणार होतं का? या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. नंतर सुनावणी घेतली जाईल.’

Sameer Wankhede
महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेससह भाजपचाही धुव्वा

न्यायमुर्ती पटेल म्हणाले, केवळ तुमच्या दोघांमध्ये (वानखेडे आणि नवाब मलिक) मीडियात शाब्दीक युध्द सुरू आहे म्हणून तात्काळ सुनावणी घ्यायची का, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, वानखेडे यांनी याचिकेत मलिकांवरही आरोप केले आहेत. एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख असताना मलिक यांच्या नातेवाईकाला आपण अटक केली होती. त्यामुळे बदल्याच्या भावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com