सदावर्तेंना आणखी एक धक्का; राहत्या घराला टाळं लागणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना चांगलंच भोवलं आहे.
Gunaratan Sadavarte
Gunaratan SadavarteSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ला प्रकरण अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणानंतर त्यांच्यावर राज्यात ठिकठिकाणी विविध कारणांसाठी गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यानंतर आता मुंबई महापालिकेनेही (BMC) त्यांना दणका दिला आहे. त्यांचं राहतं घर अनधिकृत ठरवण्यात आलं आहे. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या इमारतीत राहत असलेल्या अन्य रहिवाशांचीही घरंही अनधिकृत ठरली आहेत.

गुणरत्ने यांचं घर मुंबईतील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर्स या 16 मजली इमारतीत आहे. महापालिकेने अद्याप या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रंच दिलेलं नाही. त्यामुळे सदावर्ते यांच्यासह इमारतीतील सर्व रहिवाशांना अनधिकृत ठरवण्यात आलं आहे. इमारतीतील सर्वांना महापालिकेच्या प्रस्ताव विभागाकडून 353 ए अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे. सदावर्ते राहत असलेले घरं इमारतीच्या मुळ आराखड्यात फिटनेस सेंटर म्हणून दाखवण्यात आलं आहे.

Gunaratan Sadavarte
सदावर्तेंसारखी लोकं गरिबांना लुटून स्वत:ची घरं भरतात : अनिल परब

विकसकाने त्यात बदल करून ते सदावर्ते यांना विकलं आहे. त्यामुळे महापालिकेने सदावर्ते यांना बांधकामात अनधिकृतपणे बदल केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार त्यांना नोटीस बजावली आहे. हे बांधकाम तोडले जात नाही, तोपर्यंत इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सदावर्ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

सिल्वर ओक हल्ल्याला चिथावणी देणे, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भडखाऊ वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे अशा विविध आरोपांमुळे सदावर्ते यांच्यामागे महाराष्ट्रभरातील पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. यापूर्वी त्यांना यातील आरोपांमुळे मुंबई (Mumbai Police) आणि सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सदावर्तेंचा ताबा मिळवण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे.

Gunaratan Sadavarte
सदावर्तेंसारखी लोकं गरिबांना लुटून स्वत:ची घरं भरतात : अनिल परब

आज साताऱ्यात जामिन मिळवल्यानंतर आणि मुंबईत न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि अकोला पोलिसांनी मुंबई न्यायालयात सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी दावा केला. मात्र यात कोल्हापूर पोलिसांचा दावा पहिल्यांदा आल्यामुळे सदावर्ते यांची आजची रात्र कोल्हापुरमध्ये जाणार आहे. कोल्हापूर पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, आजच त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेवून पोलिस कोल्हापुरकडे रवाना होणार आहेत. कोल्हापुरमध्ये सदावर्ते यांना जामिन किंवा न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरच त्यांना अकोला पोलिस ताब्यात घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com