राणा दांपत्याच्या घराची मुंबई महापालिका आज घेणार 'झाडाझडती'

राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम झाल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली आहे.
Navneet Rana Ravi Rana latest news, Rana Couple news
Navneet Rana Ravi Rana latest news, Rana Couple news sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा निर्धार करुन दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (navneet rana) यांचे मुंबईतील घर असलेल्या इमारतीवर पालिकेने नोटीस बजावली आहे. (Navneet Rana Ravi Rana latest news)

महापालिकेचे पथक काल (बुधवारी) राणांच्या घराची पाहणी करणार होते.याबाबतची नोटीस पालिकेने इमारतीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राणा दांपत्याची आज जामीनावर सुटका होणार आहे.

त्यानुसार पालिकेचे पथक राणा दांपत्यांच्या खार येथील घरी काल (ता.४)पोहचली होती,पण घरी कोणीही नसल्याने नोटीस दरवाज्याला चिटकवून ही टीम परतली. त्यानंतर आज पालिकेचे अधिकारी राणांच्या घराची पाहणी करण्यासाठी दुपारी पोहचणार आहेत.

Navneet Rana Ravi Rana latest news, Rana Couple news
नॉट रिचेबल असलेले मनसे नेते वसंत मोरेंनी फेसबूक वरुन दिले स्पष्टीकरण

राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम झाल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली आहे.त्यानुसार पालिकेचे अधिकारी याबाबतची पाहणी करणार आहेत.पालिकेच्या खार वार्ड कार्यलयाच्या अधिकाऱ्यांकडून ही पाहणी होणार आहे.

Navneet Rana Ravi Rana latest news, Rana Couple news
विधानसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदा अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

खार येथील १४ वा रस्ता येथील इमारतीत राणा दांपत्याचे घर असून पालिकेने या इमारतीवर नोटीस बजावली आहे. प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दोघांविरोधात पोलिसांनी राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधान करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com