ED च्या समन्सवर चहल यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'ईडीच्या चौकशीत..'

Iqbal Singh Chahal News : कोविड सेंटरचे कंत्राट देऊन आयुक्त चहल यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
Iqbal Chahal :
Iqbal Chahal : Sarkarnama

Iqbal Singh Chahal News : मुंबई महापालिका (BMC)आयुक्त इकबाल सिंह चहल( iqbal singh chahal) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. कोरोना काळात क्वारंटाईन सेंटर उभारणीत पालिकेकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत आरोप केला होता. चहल यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

चहल यांना सोमवारी (ता.१६) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन दिवसापूर्वी आपल्याला ईडीचं समन्स मिळालं नसल्याचे चहल यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (रविवारी) त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी या, असा आदेश ईडीने चहल यांना समन्सच्या माध्यमातून दिला आहे.

Iqbal Chahal :
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सलग दुसऱ्यांदा टाळले ; काय आहे कारण..

आझाद मैदानात पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती, या तक्रारीत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या नावाचा उल्लेख होता. सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन आयुक्त चहल यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. "ईडीच्या चौकशीत मी पूर्ण सहकार्य करणार," अशी प्रतिक्रिया आयुक्त चहल यांनी दिली आहे. आतापर्यंत राजकीय व्यक्ती ईडीच्या रडारवर होत्या. आता ईडीनं आपला मोर्चा आपला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वळविल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com