मुंबईत पोलिसांनी ऑर्केस्टा, डान्स बार मध्ये वाढवली गस्ती...

Mumbai Police|Mumbai Police|Dance Bar: डान्स बार मालकांनी पोलिसांच्या विरोधात AHAR कडे तक्रार केली आहे.
Mumbai Police News, Mumbai Dance Bar News
Mumbai Police News, Mumbai Dance Bar NewsSarkarnama

मुंबई : मुंबई पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळल्याचा आरोप होऊन एक वर्षही उलटले नाही. याच आरोपातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या तुरुंगात आहेत. मात्र आता मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत. मात्र, गस्तीवर येणारे पोलिस हे आपल्या वरिष्ठांच्या आदेशानेच येत असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. मात्र, पोलिसांच्या या वाढत्या गस्तीवर अक्षेप नोंदवत डान्स बार मालकांनी पोलिसांच्या विरोधात AHAR कडे तक्रार केली आहे. (Mumbai Police News)

Mumbai Police News, Mumbai Dance Bar News
मोठी बातमी : यशवंत जाधवांच्या डायरीत आणखी दोन नावं!

मुंबईत पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीला पोलिसांच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, याविरोधात अनेक बार मालकांनी तक्रारी केल्या असून पोलिस आपल्याला त्रास देत आहेत, असा आरोप करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावर झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. तर काही बारमालकांचा आरोप असा की, त्यांचे बार पहाटे 1.30 च्या अंतिम मुदतीपूर्वी बंद करण्यास सांगितले जात आहेत. गस्तीवर येणाऱ्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते आपल्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आहेत. मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत.

Mumbai Police News, Mumbai Dance Bar News
पुतीन यांच्या दोन मुली अडचणीत; अमेरिकेनं मोठा निर्णय घेत केलं लक्ष्य

बारमालकांनी याबाबत AHAR कडे तक्रार केली आहे. तक्रारीत उदाहरण देताना म्हटले आहे की, पोलिस रात्री नऊ वाजल्यापासूनच फेऱ्या मारायला लागतात. पोलिस महिला डान्सर आणि गायकांचे फोटो काढू लागतात, यामुळे त्याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होत असून ग्राहकही घाबरले असतात. त्यामुळे ते जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर निघून जातात. तर दुसऱ्या एका हॉटेल व्यापाऱ्याने सांगितले की, अनेकवेळा पोलिस गणवेशात येतात आणि य़ेथेच झोपतात, असेही म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com