Market Committee News : राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग ? ; शिंदे गटाच्या खासदारांची प्रतिष्ठा पणाला..

Mumbai Agricultural Produce Market Committee : अशोक डक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि धनंजय वाडकर (कॉंग्रेस) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Mumbai Market Committee latest news
Mumbai Market Committee latest newssarkarnama

Mumbai Agricultural Produce Market Committee : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींनी राजीनामा दिला आहे. आता या सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्कंठा वाढली आहे. शिंदे गटाकडे बाजार समितीची (Mumbai Agricultural Produce Market Committee) सुत्रे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे बाजार समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीतील सत्ता वाटपामधील पहिली टर्म पुर्ण झाल्यामुळे सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला आहे. या दोन्ही जागेवर प्रशासकाकडून नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती अनुक्रमे अशोक डक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि धनंजय वाडकर (कॉंग्रेस) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५ ‘अ’नुसार सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे. यानुसार संबंधित जिल्हा उपनिबंधक बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करतात.

यानंतर संबंधित कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सदस्य म्हणून असलेले पद संपुष्टात येते, त्यानुसार मुंबई बाजार समितीचे संचालक असलेल्या सात संचालकांचे मुळ बाजार समितीमधील संचालकपद संपुष्टात आले आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे मुंबई बाजार समितीचे संचालक पद सुद्धा संपुष्टात आले आहे.कायद्यातील या तरतुदीनुसार माजी पणन संचालक सुनील पवार यांनी सात संचालकांचे सदस्यत्व रद्द केले होते.

कलम १५ ‘अ’ नुसार सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे. या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा उपनिबंधक बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करतात. यानंतर संबंधित कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सदस्य म्हणून असलेले पद संपुष्टात येते.

पणन मंत्र्यांच्या पदभार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या सात संचालकांनी दाद मागितली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कायद्यातील तरतुदींना फाटा देत पणन संचालकांच्या आदेशाला नियमबाह्य स्थगिती दिली आहे. यामुळे आता स्थगिती दिलेल्या संचालकांमधील माधवराव जाधव (बुलढाणा) आणि प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे) यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Mumbai Market Committee latest news
Maharashtra Corona : मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी सहा संचालकांच्या अपात्रतेता नियमबाह्य पद्धतीने स्थगिती दिली होती. यात माधवराव जाधव (बुलढाणा) आणि प्रभू पाटील (उल्हासनगर, ठाणे) यांचा समावेश आहे. जाधव हे बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांचे बंधू आहेत. तर पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे जाधव कि पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

या संचालकांना अपात्र ठरवलं

माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे), बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा), वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे), जयदत्त होळकर (निफाड नाशिक),अद्वय हिरे (नाशिक) या संचालकांना अपात्र ठरवून स्थगिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com