मोठी बातमी : मुंबईवर 26/11 सारखा दुसरा हल्ला होणार ; थेट पाकिस्तानातून मेसेज

Mumbai : दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.
Mumbai
Mumbai sarkarnama

मुंबई : मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर (mumbai)दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. हा मेसेज पाकिस्तानातून (pakistan)आल्याची माहिती आहे. गेल्या 3 दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.

धमकी देणाऱ्याने स्वतः तशी माहिती दिली आहे. या मेसेजविषयी अद्याप पोलिसांचे स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

'आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्य होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.' असा मेसेज आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे.

Mumbai
Shiv Sena : शिंदे -ठाकरे समर्थक आमने-सामने ; आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

'माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,' असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे.

देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी मुंबईला पुन्हा हादरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सध्या पोलिसांनी या फोन कॉलचा तपास सुरू केला आहे. ही खरोखरच दहशतवादी संघटनेने दिलेली धमकी आहे की कोणा व्यक्तीने गमतीशीर कॉल केला आहे, याचाही तपास केला जात आहे.

धमकीला गांभीर्याने घ्या : पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ही धमकी गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले - 'यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सरकारने या धमकीकडे गांभीर्याने पहावे.'

पवार म्हणाले' "अशी प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांनीही या धमकीकडे लक्ष द्यायला हवे. या धमकीमागे कोणती शक्ती आहे? सध्या जगात हिंसेच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे धमकीमागे अतिरेकी संघटना आहे का? याचा तपास करायला हवा. राज्य तसेच केंद्र सरकार गांभीर्याने हे प्रकरण हाताळेल अशी अपेक्षा आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com