एसी लोकलमुळे विधिमंडळातील वातावरण गरम ; ..नाहीतर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल ; आव्हाडांचा इशारा

Jitendra Awhad : प्रवाशांची गैरसोय वेळीच विचारात न घेतल्यास आगामी काळात स्टेशन्सवर आग लागेल" असे आव्हाड म्हणाले.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : मध्य रेल्वेचे प्रवासी सध्या एसी लोकल ट्रेनच्या सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेत आहेत. मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या वातानुकुलीत मुंबई लोकल (Mumbai AC Local) सेवेबाबत आता प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एसी लोकलच्या (Mumbai AC Local) मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशाला दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 6 पट वाढ झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी नुकताच केला आहे. प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या असून आमचा एसी लोकल सेवेला विरोध नाही. परंतू, गर्दीचे व्यवस्तापण करावे अशी मागणी या संघटना करत आहे.

"एसी लोकलमुळे निर्माण होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय वेळीच विचारात न घेतल्यास आगामी काळात स्टेशन्सवर आग लागेल. प्रवाशांमधून एसी लोकलबाबत प्रचंड उद्रेक आहे. एक तर एसी लोकलचे तिकट दर चांगलेच महाग आहेत. ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे," असे आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, "एक लोकल एकाच वेळी जवळपास चार ते पाच हजार प्रवाशांना घेऊन प्रवास करते. वातानुकुलीत (एसी) लोकल जेव्हा फलाटाला लागते तेव्हा त्यात सरासरी केवळ एक हजार लोकच चढतात. अशा स्थितीत फलाटावर राहणाऱ्या उर्वरीत ती ते चार हजार लोकांचे काय करायचे? या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे? या प्रश्नाचे कोणतेच उत्तर रेल्वे देत नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा,"

 Jitendra Awhad
पाटकरांचे १० कोटी पुण्यातील एका चहावाल्याच्या बँक खात्यात जमा ; सोमय्यांचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रवाशांनी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात आक्रमक होत आंदोलन केले होते. हे आंदोलन मुंबई मध्य रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या वातानुकुलीत म्हणजेच एसी लोकल गाड्यांविरोधात होते. या वेळी आक्रमक प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल बराच काळ थांबवून ठेवली. ही एसी लोकल ज्या वेळी सुटायची त्याच वेळी यापूर्वी आगोदर नियमीत सुटणारी साधी लोकल असायची. या लोकलमधून लोक प्रवास करत असत. मात्र, त्याच वेळी एसी लोकल सुरु केल्याने अनेकांची गैरसोय झाली. परिणामी प्रवासी आक्रमक झाले त्यांनी आंदोलन केले. याच आंदोलनाविषयी माहित देत आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी इशारा दिला.

एसी लोकल ट्रेनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते. परंतु 5.22 ला सीएसटीहून सुटणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या एसी ट्रेनमुळे बदलापूरात प्रवाशांचा उद्रेक समोर आला. 5.22 ही साधारण लोकल ठेवावी आणि एसी लोकल रद्द करावी अशी मागणी काही दिवसापूर्वी प्रवाशांनी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com