आर्यन खानला क्लिनचिट मिळताच मुकुल रोहतगी म्हणाले...

मुकुल रोहतगींनी आर्यनला जामीन मिळवून दिला होता
आर्यन खानला क्लिनचिट मिळताच मुकुल रोहतगी म्हणाले...
Mukul Rohatgi Sarkarnama

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला क्लिनचिट देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दिली आहे. यावर आर्यन खानच्या वतीने बाजू मांडणारे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Aryan khan latest Marathi News)

शाहरुखने आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, असे सांगून रोहतगी म्हणाले की, आर्यनला अटक करण्यासाठी एनसीबीकडे कोणतेही पुरावे नव्हते. त्याच्याकडे ड्रग्ज सापडलेले नव्हते. एनसीबीने त्यांचा चूक व्यायसायिकरीत्या कबूल केल्याबद्दल मी समाधानी आहे. मी आता सुटका झाल्यासारखे वाटत आहे. हीच शाहरूख खानसह माझ्या अशिलाची आहे. अखेर सत्य हे समोर आलंच.

Mukul Rohatgi
समीर वानखेडेंना दणका! केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कारवाईचे आदेश

समीर वानखेडे यांनीची क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून कारवाई करत आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी मुकुल रोहतगी मैदानात उतरले होते. अखेर ते आर्यनला जामीन मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते. आर्यनची तब्बल 22 दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली होती. दरम्यान, या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. आर्यन खानला अडकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. अखेर त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलं आहे.

Mukul Rohatgi
राजकारण तापलं! नेत्याच्या पत्नीला तिकीट नाकारल्यानं समर्थक आमदार बंडखोरीच्या तयारीत

दरम्यान, कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरne कारवाई करीत खळबळ उडवून दिली होती. याच कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं महत्व आलं होतं. राजकीय क्षेत्रातही यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपाच्या फैरी झडल्या होत्या. अखेर 22 दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. या तपासासाठी एनसीबीच्या दिल्लीतील पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in