उद्धव ठाकरे-अदानींच्या भेटीनंतर शिंदे अन् मुकेश अंबानींची भेट; राजकीय वर्तुळाच चर्चा

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Mukesh Ambani, Eknath Shinde
Mukesh Ambani, Eknath Shindesarkarnama

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी हे वर्षा या शासकीय निवासस्थानी शिंदेच्या भेटीसाठी गेले होते. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित भेटीची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

या वेळी मुकेश अंबानी यांच्यासोबत अनंत अंबानी देखील उपस्थित होते. ते दोघेही रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचले होते. भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. रात्री 12 च्या सुमारास अंबानी वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, याचा तपशील समोर आलेला नाही. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Mukesh Ambani, Eknath Shinde
Madhuri Misal : पुण्यातल्या भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबानी यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. दरम्यान, यापुर्वी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी बुधवारी (ता. 20 सप्टेंबरला) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती.

आता एकनाथ शिंदे यांची मुकेश अंबानी यांनी भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. देशातील दोन आघाडीच्या उद्योगपतींनी काही दिवसांच्या अंतराने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Mukesh Ambani, Eknath Shinde
भाजपचा कोथळा काढायला निघालेले आता कुठल्या बिळात बसला आहात ? ; उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत ?

गौतम अदानी व उद्धव ठाकरे यांच्यात पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये अदानी समूहाला व्यावासायिकदृष्ट्या रस आहे. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मिळाल्यास अदानी समूहासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असू शकतो. त्या संदर्भात या भेटीत काही चर्चा झाली असा, अशी शक्याता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीनंतर तीन चार दिवसातच मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com