Mukesh Ambani Gift : मुकेश अंबानींनी 'मोदीं'ना भेट दिली 1500 कोटींची अलिशान इमारत, खासियत वाचून व्हाल थक्क

Mukesh Ambani Gift To Employee Manoj Modi: भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर भेट दिले आहे.
Mukesh Ambani, Manoj Modi
Mukesh Ambani, Manoj ModiSarkarnama

Mukesh Ambani gifts manoj modi house of 1500 crore Rs: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या खास कर्मचाऱ्याला मौल्यवान भेटवस्तू दिली आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना 1 हजार 500 कोटी रुपयांची अलिशान इमारत भेट म्हणून दिली आहे. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा पाहून मुकेश अंबानी यांनी त्यांना ही भेट दिल्याचे बोलले जाते.

मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे राईट हॅड मानले जातात आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक डीलमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. रिलायन्स उद्योगाच्या यशात उद्योगाच्या यशात मनोज मोदींचा सिंहाचा वाटा आहे. मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडले गेले आणि तेव्हापासून ते कंपनीसोबत आहेत.

Mukesh Ambani, Manoj Modi
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्रातील या 'नऊ' खास गोष्टी माहीत आहेत का?

कोण आहेत मनोज मोदी

मनोज मोदी यांना 'एमएम' या नावाने ओळखले जाते. (Manoj Modi Profile)  मुकेश अंबानींच्या अगदी जवळचे असे ओळखले जाणारे मनोज मोदी खरे तर त्यांचे कॉलेज मित्र आहेत. अंबानी आणि मोदी हे मुंबई विद्यापीठाच्या 'केमिकल टेक्नॉलॉजी विभागात' बॅचमेट होते आणि दोघांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये 'बॅचलर डिग्री' मिळवली होती. रिलायन्स ग्रुपमध्ये अंबानी आणि मोदी यांची एंट्रीही जवळपास एकाच वेळी झाली.

मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये सामील झाले आणि मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये वडिलांच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये संचालक आहेत. सर्वेसर्वा असूनही मनोज मोदी लाइमलाइटपासून दूर राहतात. रिलायन्स समूहाच्या भरभराटीत मनोज मोदी यांच मोठ योगदान आहे.

Mukesh Ambani, Manoj Modi
BJP News : राऊतांबाबत भाजपचा मोठा निर्णय ; नितेश राणेंवर मोठी जबाबदारी ; ठाकरेंची अनेक गुपितं उघडणार..?

काय आहे घराची खासियत

अंबानी कुटुंबाने मनोज मोदींसाठी मुंबईतील एका भागात 22 मजली इमारत खरेदी केली आहे. नेपियन्सी रोड परिसरात असलेल्या या इमारतीचं नाव 'वृंदावन'आहे. मुंबईतील महागड्या परिसरांमध्ये नेपियन्सी रोड भागाचा समावेश होतो. येथील रहिवाशी मालमत्तांचा दर ४५ हजार ते ७० हजार प्रति चौरस फुटांच्या घरात जातो.

अंबानींनी मोदींना भेट दिलेल्या इमारतीचं बाजारमूल्य तब्बल १५०० कोटींच्या घरात आहे. इमारतीचा प्रत्येक मजला ८ हजार चौरस फुटांचा आहे. ही एकूण मालमत्ता १.७ लाख चौरस फुटांची आहे. या घरातील फर्निचर इटलीहून आयात केले आहे. अहवालानुसार, घराचे डिझायनर 'तलाटी अँड पार्टनर्स एलएलपी' आहेत.

Mukesh Ambani, Manoj Modi
Reena Dwivedi New Look: पिवळी साडीवाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता 'हे' फोटो झाले व्हायरल

कशी आहे ही अलिशान इमारत?

इमारतीच्या आठव्या ते दहाव्या मजल्यावर मनोरंजनाच्या सुविधा असणार आहे. डिजिटल गेमिंग, पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, 50 प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले थिएटर याच भागात असेल. तसेच अत्याधुनिक खेळांच्या सोयी या ठिकाणी असतील. मनोज मोदींचे कार्यालय देखील इमारतीतच असेल, या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधांनी युक्त असा एक मजला असणार आहे. जिथे एक इन हाऊस मेडिकल 'आयसीयू' देखील असेल.

इमारतीच्या 19 आणि 21 व्या मजल्यावर 'पेंटहाऊस' असेल, तिथे मोदी त्यांच्या कुटुंबासोबत राहतील. इमारतीतील फर्निचर नीता अंबानींनी पसंद केलेल्या डिझाइनचे आहे. मोदी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी 175 कर्मचारी निवासस्थानी असणार आहे. त्यात शेफ आणि व्यवस्थापकांचा समावेश असेल. इमारतीच्या सुरक्षेसाठी खास काळजी घेण्यात आली आहे, इमारतीची सुरक्षा यंत्रणा इस्रायलस्थित कंपनीने डिझाईन केली आहे.

Edited by : Rashmi Mane

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com